Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

मुंबईत शिक्रापूरकरांनी घातले 108 ‘सूर्यनमस्कार’

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा: प्रतिनिधी (विनायक साबळे)

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जय श्रीराम हेल्थ क्लबच्या सदस्यांनी मुबंईत ननस्टॉप 108 सूर्यनमस्कार घालत शिक्रापूरची छाप उमटवली.
जय श्रीराम हेल्थ क्लब मधील प्रशिक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस हवालदार कल्पेश राखोंडे, अभिजीत चांदगुडे, कैलास खेडकर, संदीप कळमकर, पद्माकर लोखंडे, सुनिल दौंडकर, दयानंद गावडे, दिनेश फुंदे, भगवान देवधरे, दत्ता शिवले या बारा सदस्यांनी मुंबई घाटकोपर येथे आयोजित १०८ सुर्य नमस्कार कार्यक्रमात सहभाग घेत न थांबता तब्बल १०८ सूर्यनमस्कार काही वेळात पूर्ण केले.
शिक्रापूर, येथील जय श्रीराम हेल्थ क्लबच्या तब्बल बारा सदस्यांनी मुंबईमध्ये आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभाग घेत १०८ सूर्यनमस्कार करत शिक्रापूरची छाप मुंबई मध्ये उमटवली.

या मध्ये वय वर्षे १० ते ८९ गटातील तब्बल एक हजार ८०० स्त्री पुरुषांनी सहभाग नोंदविला. शिक्रापूरच्या जय श्रीराम हेल्थ क्लबच्या बारा सदस्यांनी यश मिळवले असून सर्वांचे जॉली जिमखाना ट्रस्ट कडून अभिनंदन करण्यात आले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21