Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

मोफत मोतबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनीधी
शिरूर तालुक्यातील थापेमळा येथे सरणेस वाडिया फाऊंडेशन तर्फे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव व बुधरानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पशुसंवर्धन आणि आधारित शाश्वत उपजीविका प्रशिक्षण शिबिर व मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिर बुधवार दिनांक 25 /12 /2024 रोजी थापेमळा येथे संभाजी कर्डिले यांनी आयोजित केले होते.
त्यावेळी यावेळी श्याम लोंढे यांनी ब्रिटानिया कंपनीमध्ये होणाऱ्या अनेक प्रॉडक्ट व दूध संकलन कसे होते याविषयी माहिती सांगत ब्रिटानिया कंपनीतर्फे शुद्ध पाणी , जल संवर्धन मोहीम राबवणे, अनेक ठिकाणी मोफत झाडे लावणे तसेच किशोरवयीन मुलींसाठी अनेक शिबिरे राबवणे ,गरीब कुटुंबांना कोंबडी वाटप करणे व कोरोना काळात ज्या मुलांचे वडील गेले आहेत त्यांना शिक्षणासाठी मदत करणे व कवठे येमाई गावांमध्ये कायमस्वरूपी महिला प्रशिक्षण केंद्र चालवणे व एखाद्या गरीब कुटुंबाला हॉस्पिटल ची गरज लागल्यास हि ब्रिटानिया कंपनी मदत करण्यास अग्रेसर आहे अशी माहिती तुमच्या शिबिराच्या वेळेस त्यांनी दिली.
तर दातत्रय खोमणे यांनी भारतात सर्वात जास्त डोके वर काढत असणारा आजार म्हणजे कॅन्सर व हा कॅन्सर कशाप्रकारे आपल्या रोजच्या भाजीपाल्यासारख्या खाण्याच्या गोष्टी पासून आपल्या शरीरात शिरकाव करतोय व आपले जीवन संपून टाकतो, याविषयी सांगत आपण प्रथमता प्रत्येक घरात पारस बाग फुलविली पाहिजे व स्वतःला लागणाऱ्या विषमुक्त भाज्या स्वतः पिकलेल्या पाहिजे तरच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. तसेच ते पुढे बोलले प्रत्येक शेतकरी करत असणारा दुग्ध व्यवसाय व त्या दुधामध्ये भर पाडायचे असेल तर आपल्या गाईचे संगोपन कसे करावे व गाईला होणाऱ्या अनेक भयानक आजारांपासून कसे मुक्त करायचे ,एका व्यक्तीला कशा प्रकारे अनेक गाई सांभाळता येतील याविषयी खूप मोलाची माहिती त्यांनी यावेळेस देत,मुक्त गोठ्यातील गाई व त्या गाईला रोज फक्त दहा मिनिटे स्वच्छ आंघोळ घालून व तिच्या गोठ्याचे योग्य प्रकारे स्वच्छता राखून रोज निघणाऱ्या दुधात आपण भर पाडून गाईचे व परिणामी दूध पिणाऱ्या सर्वांचे आयुष्य वाढवू शकतो, असे ते बोलले.
या शिबिराच्या वेळेस अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत संभाजी कर्डिले यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेली शाम लोंढे असिस्टंट मॅनेजर ब्रिटानिया कंपनी, दत्तात्रय खोमणे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव , सुमेय पुरंदर सरनेस वाडिया फाउंडेशन, अक्षय जेजुरकर सर नेस फाउंडेशन ,रामेश्वर राऊत सरनेस फाउंडेशन ,गिरीश पाटील प्रकल्प अधिकारी रुद्र बुधराणी हॉस्पिटल वैभव गाढवे फिल्ड एक्झिटिव्ह बुधराणी हॉस्पिटल, कृषी अधिकारी गदादे व सरपंच जगदीश पाचर्णे, शहा सर थिटे कॉलेज मुख्याध्यापक, पत्रकार सतीश धुमाळ व अनेक क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते.
त्यावेळी ऍडव्हान्टा कंपनीतर्फे उपस्थित शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच विठ्ठल घावटे, ऍड हिलाल, आप्पा वर्पे, किशोर सरोदे व मा.सरपंच वर्षा काळे यांच्या हस्ते या बियाण्यांची वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले.
उपस्थित सर्व मान्यवर व शेतकरी बंधू भगिनी यांचे आभार संभाजी कर्डिले यांनी मानले व उपस्थित सर्वांना भोजनाची व्यवस्था संभाजी राजे कर्डिले प्रतिष्ठान शिरूर यांच्या कडून करण्यात आली होती.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 0 8
Users Today : 146
Users Yesterday : 503