कोरेगाव भिमा: प्रतिनिधी(विनायक साबळे)
ग्राहकांची फसवणूक कशी होते व त्यासाठी काय उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत याबाबत सांगत ग्राहकांनी सदैव जागृत राहणे गरजेचे असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य धनंजय गायकवाड यांनी व्यक्त केले
नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सनसवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनवले होत्या. यावेळी पोलीस अधिकारी स्नेहा जाधव उपस्थित होत्या
रोहिणी सोनावले यांनी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना बालक कायदा या संदर्भात माहिती देत मार्गदर्शन केले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पर्वतराज नाबगे, अशोक दरेकर, शिरूर तालुका संघटक अशोक मोरे, शिरूर तालुका उपाध्यक्ष रामदास दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे गणेश दरेकर, बाळासाहेब सैद, मुख्याध्यापिका राधिका मेंगवडे, पर्यवेक्षक अशोक दरेकर व समस्त शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा फुंदे यांनी केले.
[- ग्राहकांनी सदैव तत्पर राहिले पाहिजे व आपली व समाजाची फसवणूक होऊ नये यासाठी ततसंबंधी योग्य तो अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत ग्राहक पंचायतचे पर्वतराज नाबगे यांनी व्यक्त केले.]
