सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांच्याकडून मयूर यादव याचा सत्कार…

सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्याकडून बाभुळसर बु येथील मयुर किरण यादव शिरूर तालुक्यात प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मयूर हा मांडवगण फराटा येथील वाघेश्वर विद्याधाम प्रशाला माध्यमिक विद्यालय येथे एसएससी परीक्षेत शिरूर विभागात प्रथम आला आहे ,या यशस्वी विद्यार्थ्यांने तालुकास्तरावर कौतुकाची थाप पडली असून प्रशालेचं व बाभुळसर बु. गावाचं नाव उज्वल … Read more

स्वराज्य रक्षक फाऊंडेशन तर्फे फळ वाटप…..

शिरूर प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले
स्वराज्य रक्षक फाऊंडेशन ही कायम अनाथ मुले व महिलांच्या उन्नती साठी काम करत असते.
स्वराज्य रक्षक फाऊंडेशनचे संचालक रवी लेंडे,प्रथमेश चाळके व पियुष वेदपाठक यांनी अनेक छोटे मोठे कार्यक्रम घेतले आहेत.
अगदी महिलांच्या आरोग्यापासुन तर महिलाना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि उपक्रम स्वराज्य रक्षक संस्था राबवत असते.
स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संचालक रवी लेंडे, प्रथमेश चाळके ववेदपाठक यांच्या मार्गद्शनाखाली नुकतेच रामलिंग रोड येथील माहेर संस्थेमधील मुलांना फळ वाटप करण्यात आले ,त्या वेळेस संस्थेतील सर्व मुले आनंदाने फळांचा आस्वाद घेताना दिसली. या कार्यक्रमाची व संस्थेची माहिती रवी लेंडे यांनी शरली दीदी यांना देत सर्व उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे वेळी माहेर संस्थेच्या शरली दीदी, शिलानंद आंभोरे, स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी लेंडे, गणेश.., पत्रकार रुपाली खिल्लारी, पत्रकार किरण झाबरे, पत्रकार शोभा परदेशी, सुजित लीमन, विक्रम ठाकूर, सुवर्ण नळकांडे व माहेर संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Read more

शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान [सरपंच रमेश गडदे यांनी केले मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाचे कौतुक]

शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान [सरपंच रमेश गडदे यांनी केले मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाचे कौतुक] शिरूर प्रतिनिधी: दातत्रय कर्डिले सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात येत्या जूनपासून पुढील पाच वर्षांसाठी झाल्याने शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेश गडदे यांच्या शुभहस्ते त्यांचा … Read more