शिरूर प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले
स्वराज्य रक्षक फाऊंडेशन ही कायम अनाथ मुले व महिलांच्या उन्नती साठी काम करत असते.
स्वराज्य रक्षक फाऊंडेशनचे संचालक रवी लेंडे,प्रथमेश चाळके व पियुष वेदपाठक यांनी अनेक छोटे मोठे कार्यक्रम घेतले आहेत.
अगदी महिलांच्या आरोग्यापासुन तर महिलाना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि उपक्रम स्वराज्य रक्षक संस्था राबवत असते.
स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संचालक रवी लेंडे, प्रथमेश चाळके ववेदपाठक यांच्या मार्गद्शनाखाली नुकतेच रामलिंग रोड येथील माहेर संस्थेमधील मुलांना फळ वाटप करण्यात आले ,त्या वेळेस संस्थेतील सर्व मुले आनंदाने फळांचा आस्वाद घेताना दिसली. या कार्यक्रमाची व संस्थेची माहिती रवी लेंडे यांनी शरली दीदी यांना देत सर्व उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे वेळी माहेर संस्थेच्या शरली दीदी, शिलानंद आंभोरे, स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी लेंडे, गणेश.., पत्रकार रुपाली खिल्लारी, पत्रकार किरण झाबरे, पत्रकार शोभा परदेशी, सुजित लीमन, विक्रम ठाकूर, सुवर्ण नळकांडे व माहेर संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.
