शिरूर प्रतिनिधी :—
दि.१४/०७/२०२४रोजी विशाळगड कोल्हापूर येतील गजापुर येथे मुसलमानवाडी या गावावर काही समाजकंटकानी हल्ला केला होता.

ही घटना माणुसकीला कालिंबा फासणारी व मानवाच्या जीवितास, मालमतेस नुकसान करणारी आहे. गडावरील अतिक्रण हटवणे हे न्यायालयीन व जिल्हा प्रशासनाचे काम आहे, तेथे व्यवसाय करणारे सर्व जाती धर्माचे नागरिक आहेत. या सर्वावर खटला सुरू आहे व हे सर्व सर्वांनी मान्य केलेले असताना व जिल्हा प्रशासन या सर्व निकषावर कारवाई करणार, असे असताना व गडा पासून गजापुर मुसलमानवाडी हे गाव जवळजवळ चार किलमीटरवर अंतरावर असुन, तेथे सर्व जाती धर्माचे लोक राहण्यास आहेत.
गजापुर मुसलमानवाडी या गावात अनेक मंदिरे व मज्जिद आहेत. या गावावर हल्ला करताना, समाजकांट कानी या हल्ल्यात अनेक धार्मिक स्थळ, वस्तू दिव्यग्रंथ कुराण फाडणे , जाळणे व त्या ग्रंथाची विटंबना केलेली आहे. असे करणऱ्यांवर कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन शिरूर शहर सुन्नी मुस्लिम जमात यांनी शिरूर पोलिस स्टेशन व तहसील कार्यालयात दिले आहे.

यावेळी सुन्नी मुस्लिम जमात चे सचिव सिकंदरभाई मणियार, कर्याधक्ष जमीर सय्यद, खजिनदार साबीरभाई शेख, सभासद फिरोजभाई बागवान, सभासद शकीलभाई खान उपस्थित होते.






Users Today : 5
Users Yesterday : 9