शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथे दिनांक १६ जुलै २०२४ रोजी आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम शाळेत मुलांना व पालकांना विठुराया आणि आषाढी चे महत्व समजावे या उद्देशाने शाळेमध्ये आषाढी एकादशी उत्साहाने साजरी करण्यात आली.
शिक्षक पालक समिती सदस्य तसेच सर्व शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापिका अश्विनी घारू मॅडम तसेच प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका तृप्ती आगळे मॅडम आणि अफसाना सय्यद मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन पालखी पूजन व विठ्ठलाची आरती झाली.
शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी विठू नामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विठ्ठल रखुमाई,वारकरी, तुकाराम ज्ञानदेव निवृत्ती सोपान, मुक्ताई अशा वेगवेगळ्या पोशाखातील विद्यार्थ्यांनी परिसरात काढलेली दिंडी आणि विठू माऊलीचा जयघोष यामुळे चैतन्य उतरले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका अश्विनी घारू मॅडम यांच्या ‘माझी वारी’ या काव्य वाचनाने झाली. यावेळी प्रेक्षक भारावून गेले.
चल ग सखे, माऊली माऊली या गाण्यांवर चिमुकल्यांनी ठेका धरला. तसेच टाळ मृदुंग वाजवी हरिनामाच्या गजरात विठुरायाची नगरी विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर नृत्य केले.
इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी पाण्याचे महत्व सांगणाऱ्या भारुडाचे सादरीकरण केले. शिक्षिकांद्वारे ‘रखुमाई रखुमाई’ या गाण्यावर केलेले नृत्याचे सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
विद्याधाम प्राथमिक विद्यालयाच्या मुळे मॅडम तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शेळके सर आणि देशपांडे सर हे ही या कार्यक्रमास उपस्थित होते.शाळेचे चेअरमन अनिल बोरा, सचिव निकम तसेच शालेय समितीचे सदस्य धरमचंद फुलफगर यांनी या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता प्रीती सोनवणे मॅडम यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.






Users Today : 5
Users Yesterday : 9