शिरूर प्रतिनिधी.
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजना ग्रामपंचायत बाभुळसर बू! येथे एकत्रीत गावातील महिलांचे फॉर्म भरून राबविण्यात आली.
बाभुळसर बू!ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या आयोजनातुन 8व 9जुलै या दोन दिवशी माझी लाडकी बहीण योजनेचा कॅम्प घेण्यात आला.
यावेळी गावातील महिला भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद देत आपले फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा केले.यावेळी स्वतः सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी आणि अंगणवाडी सेविका आशा रणदिवे, स्नेहा नागवडे,मीना माने,लता गवळी यांच्या सहकार्याने ते फॉर्म भरून घेण्यात आले.
यावेळी दिपाली नागवडे म्हणाल्या राज्यशासनाच्या या योजनेमुळे महिला वर्गाला याचा लाभ होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बजेट मध्ये या योजनेचा समावेश केेला त्याबद्दल मी ऐक महिला सरपंच म्हणून आणि सर्व महिला भगिनी तर्फे या महायुती सरकारचे आभार मानते असे ही त्या यावेळी बोलल्या.
माझी लाडकी बहीण या योजनेमुळे सर्व महिला भगिनीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येते असून त्यांनी या निर्णयाचे स्वागत करून सरकारचे अभिनंदन केले आहे.






Users Today : 6
Users Yesterday : 9