पुण्यात खळाळल्या श्रृंखला पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन…

Facebook
Twitter
WhatsApp

लेखक धनंजय गुडसूरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

सरदवाडी प्रतिनिधि :– दत्तात्रय कर्डिले 

पुणे येथे प्रसिद्ध साहित्यिक धनंजय गुडसूरकर लिखित खळाळल्या श्रृंखला या पुस्तकाचे प्रकाशन लेखक व सनदी अधिकारी व मुक्तिसंग्रामचे अभ्यासक कौस्तुभ दिवेगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ . संगीता बर्वे पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव उपस्थित होते.

लेखक धनंजय गुडसूरकर लिखित खळाळल्या श्रृंखला या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मराठवाडा मित्र मंडळ डेक्कन जिमखाना पुणे येथे 6 जुलै 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता नुकताच पार पडला.गुडसूरकर लिखित खळाळल्या श्रृंखला या पुस्तकाचे प्रकाशन लेखक व सनदी अधिकारी व मुक्तिसंग्रामचे अभ्यासक कौस्तुभ दिवेगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ . संगीता बर्वे पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव उपस्थित होते.

सचिन बेंडभर यांच्या बालकाव्यसंग्रास पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार ..

यावेळी कार्यक्रमाला शिवांजली साहित्यपीठ जुन्नरचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव चाळक, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यकारणी सदस्य सचिन बेंडभर पाटील, प्रसिद्ध भाषातज्ञ खंडेराव कुलकर्णी, निर्मलाताई गुडसूरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खळाळल्या श्रृंखला या पुस्तकाचे प्रकाशन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख व उपस्थित मान्यवर.

 

जुना इतिहास शिकून विकासाचा संग्राम केला पाहिजे

कुठल्याही अन्याय लिमिटच्या बाहेर जातो तेव्हा लोक पेटून उठतातच मुक्ती संग्रामाला अनेक थोर नेते लाभले हा लढा अत्यंत महत्त्वाचा होता याला महात्मा गांधीजींची जोड द्यायला हवी.जुना इतिहास शिकून विकासाचा संग्राम केला पाहिजे अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 5 5 3 0 9
Users Today : 17
Users Yesterday : 22