शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध फक्त नागरिकांच्या हिता साठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आज दि.8/07/2024 रोजी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.
शिरूर नगर पालिकेलीकेत अनेक चुकीच्या गोष्टी होत आहेत व त्याबाबत जवळ जवळ एक वर्ष पाठपुरावा करुनही त्या विषयांना न्याय मिळत नसल्यामुळे महीबुब सय्यद यांनी दि.8/07/2024पासून पुणे येथील जिल्हधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
यामध्ये भंगार साहित्य विल्हेवाट, शिरूर शहरातील फुटपाथावरील अतिक्रमणे, घनकचरा प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने न होणे बाबत, शहरातील अनाधिकृत बांधकामे, रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग, शहरात झालेले अनधिकृत मोबाईल टॉवर, गोलेगाव रोडवरील विजेच्या खांबातून झालेली वीज चोरी, जिओ कंपनीचे फुटपात वरील अतीक्रमण, कोअर प्रोजेक्ट या संस्थेवर दंडात्मक कारवाई, जलशुद्धीकरण केंद्र शेजारी फाउंटन दुरुस्ती, बस स्थानक शेजारी नाल्यातील अनाधिकृत भिंत बांधकाम, पुररेशेतील अनाधिकृत झालेली बांधकामे ह्या व अशा अनेक चुकीच्या गोष्टींना नगरपालिका पाठीशी घालत आहे व योग्य ती माहिती देत नसल्यामुळे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी आपल्या वरील सर्व चुकीच्या गोष्टींना आळा बसत नाही व दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याची माहिती दिली. यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे व मनसेचे अविनाश घोगरे उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून शिरूर नगर पालिकेत अनेक चुकीच्या गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे व मागितलेली माहिती दिली जात नाही, अशा चर्चा सुरू आहेत. अगदी काही कामानिमित्त कॉल केला तरी मुख्याधिकारी मॅडम कॉलही घेत नाही, असे ही होत आहे.
