द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :—-  दत्तात्रय कर्डिले

शिरूर शहरात,द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या राज्याच्या पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन कऱण्यात आले होते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या, मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते .

यास प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या बिग बॉस फेम व भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्य वन संरक्षक नागपूर प्रादेशिक विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी रंगनाथ नाईकडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ,शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे ,तहसीलदार बाळासाहेब म्हस्के ,सार्वभौम चे संपादक सागर शिंदे, तसेच खरेदी विक्री संघाचे संचालक बाबासाहेब काळे हे होते.

कार्यक्रमावेळी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या आपण करत असलेले काम चुकीचे आहे की बरोबर हे आपण ठरवायचे असते लोक काय बोलतील हा विचार न करता आपण आपले ध्येय निश्चित करावे यातून आपल्याला यशाचा मार्ग मिळतो त्याचबरोबर पत्रकार हे ऊन वारा न पाहता समाजासाठी काम करत असतात शासनाने पत्रकारांना पेन्शन योजना लागू केल्यास पत्रकारांना योग्य न्याय मिळेल आम्ही जे काम करतो किंवा समाजात इतर व्यक्ती जे काम करतात हे काम समाजात पोहोचवण्याचे प्रमुख साधन पत्रकारिता आहे त्यामुळे पत्रकारांनाही पेन्शन योजना तसेच शासनाने इतर योजनेचाही लाभ देणे गरजेचे आहे.

यादरम्यान बोलताना रंगनाथ नाईकडे म्हणाले की पुरस्कार हा आपल्या कार्याचा गुणगौरव असून यामुळे सामाजिक कामाचे प्रेरणा मिळते हे आपण जोपासले पाहिजे, त्याचबरोबर आज आलेला प्रत्येक पुरस्कार ती हा महत्त्वाचा असून त्यांच्याकडून यापुढेही सामाजिक कार्याची अपेक्षा आहे असे मत व्यक्त केले .
यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, राज्य कार्याध्यक्ष अनिल करंजकर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे राज्य अध्यक्ष रोहित वाळके, राज्य उपाध्यक्ष हेमंत साठे, राज्य सहसचिव विवेकानंद फंड ,सातारा जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते, ठाणे शहराध्यक्ष सोनू क्षेत्रे लातूर विभागीय अध्यक्ष विष्णू पोले , शिरूर तालुका अध्यक्ष शकील मणियार, अध्यक्ष विश्वनाथ घोडके , शौकत शेख , संतोष कदम संतोष काळे आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 2
Users Today : 6
Users Yesterday : 9