ट्रॅव्हल्स व ट्रकच्या अपघातात जामखेडच्या तरुणाचा मृत्यू…

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनीधी  :—- सागर पवार

जामखेड हुन पुणे येथे आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना नगर सोलापूर रस्त्यावर ट्रॅव्हल्स व ट्रकच्या अपघातात जामखेड येथील दिपक विलास पवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदरचा आपघात नगर-सोलापूर रोडवरील माहीजळगाव रोडवर घडला आहे.

याबाबत, अधिक माहिती अशी की जामखेड येथील दिपक विलास पवार वय 39 , (हल्ली राहणार खडकी, पुणे) हा पुणे येथील येथे आपल्या कुटुंबासमवेत नोकरी निमित्त रहात होता. तो पुणे येथील खडकी कँन्टोमेंन्ट परीसरातील सेंट्रल गव्हर्न्मेंट च्या दारुगोळा बनवणाऱ्या विभागात नोकरीस होता. जामखेड येथे दिपक च्या घराचे बांधकाम सुरू असल्याने तो गावी आला होता. काल रविवारी सुट्टी संपल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी हजर रहाण्यासाठी तो रात्री उशिरा जामखेड येथुन खाजगी ट्रॅव्हल गाडीने पुणे येथे चालला होता.

गाडीत जागा नसल्याने तो पुढे ड्रायव्हरच्या बाजुच्या कॅबिनमध्ये बसला होता. सदरची ट्रॅव्हल्स नगर जामखेड रस्ता खराब आसल्याने माहीजळगाव मार्गे पुणे येथे चालली होती. यावेळी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या ट्रॅव्हल्सची समोर चाललेल्या ट्रकला किन्नर साईडच्या बाजुने जोराची धडक बसली.

या अपघातात कॅबिन मध्ये बसलेला दिपक पवार हा गंभीर जखमी झाल्याने नगर येथे हलवण्यात आले होते, मात्र पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दिपक पवार याच्यावर जामखेड येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे एक लहान मुलगा ,पत्नी व आई वडील असा परीवार आहे. दिपक याच्या आपघातती मृत्यू मुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 4
Users Today : 8
Users Yesterday : 9