शिरुर प्रतिनिधी
शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोऱ्हाडे मळा येथील अंगणवाडीत दि १८/०६/२०२४ रोजी दुपारी १४:०० वा ते दि. १९/०६/२०२४ रोजी सकाळी ०८:३० वा चे सुमारास, अंगणवाडी असणाऱ्या साहित्याची चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
बो-हाडेमळा ता शिरूर जि पुणे येथील अंगणवाडी कुणीतरी अज्ञात चोरटयाने अंगणवाडीचे कुलुप कोंडा तोडुन आत प्रवेश करून एल सी डी टिव्ही, गॅस सिलेंडर, गोडे तेल, शेगडी कुकर व इतर किराणा वस्तु असे एकुन १४,३००/- रू चा मुददेमाल चोरून घेवुन किराणा वस्तुची नासधूस करून नुकसान केले आहे .
हे निदर्शनास येताच शिरूर पोलीस स्टेशन येथे रोहिणी अशोक बोऱ्हाडे रा .बोऱ्हाडे मळा, शिरूर यांनी ipc कलम 380, 457 प्रमाणे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अशोक शिंदे हे पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनखाली करत आहे






Users Today : 8
Users Yesterday : 9