पुणे प्रतिनिधी :सागर पवार
शिवराज्याभिषेक म्हणजे स्वराज्यातील अठरापगड जातींच्या मावळ्यांना घेवून केलेली एक सामाजिक क्रांती होती. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस)ग्रुपच्या वतीने दुबई येथे नुकताच शिवराज्याभिषेक दिन दुसर्यांदा साजरा करण्यात आला. जेएसएस प्राईव्ह स्कूल अल सफा दुबई (युएई) येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ सिने अभिनेते,लेखक,दिग्दर्शक शिवश्री प्रवीण तरडे, शाहीर शिवराज भोर- पाटील, सिने अभिनेता निखील निगडे, राजेश बाहेती, संतोष गायकवाड, उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना प्रवीण तरडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य हे एका राजाचे नव्हते तर ते रयतेचे होते. शिवराज्याभिषेक हा स्वराज्यातील रयतेच्या स्वातंत्र्याचा सोहळा होता. हा रयतोत्सव होता असे प्रतिपादन केले. या कार्यक्रम स्थळी छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले शाहू महाराज (पहिले)यांच्या जगभरातील दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शिवशाहीर शिवराज भोर पाटील यांनी गगनभेदी आवाजात पोवाडा गायला, जिजाऊ ब्रिगेडने जिजाऊ वंदना गायन केले.तसेच महाराष्ट्रातील स्वामिनी महिला ढोल तशा पथक आणि दुबईतील युवकाच्या “श्रीमंत ढोल ताशा पथकाने वादन केले. पल्लवी निगडे, सुवर्ण पाटील, अश्विनी गावडे यांनी शिवनाटिका सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन अभिजित देशमुख,विक्रम भोसले,अमोल डुबे-पाटील,संदीप कड,मुकुंदराज पाटील,गणेश डफळे,सुनिता देशमुख,प्रियांका भोसले,संध्या कड,विनायक पवार,सुहास झांजे,शिवाजी काका नरुने,रघुनाथ सगळे, अक्षय माने यांनी केले.संदीप पवार यांनी आभार मानले.
छायाचित्र : उपस्थित मान्यवरांचे समूह चित्र.







Users Today : 9
Users Yesterday : 9