सेवानिवृत पोलीसांच्या शिखर संस्थेचे अधिवेशन उत्साहात संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:
राज्य पातळीवर सेवानिवृत्त पोलिसांसाठी काम करत असलेली, पुणे स्थित असलेली सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था, या संस्थेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाल्याने, प्रथम वर्धापन दिनाचा सोहळा पुणे येथे शिखर संस्थेचे राज्याचे अध्यक्ष संपतराव जाधव यांचे अध्यक्षते खाली मोठ्या थाटात माटात संपन्न झाला.
या वर्धापन सोहळ्यासाठी, संस्थेचे राज्यभरातील जिल्ह्यांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. या सोहळ्यासाठी आलेल्या राज्यातील जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींना, संस्थेने वर्षभरात केलेल्या कामाची व सेवानिवृत्त पोलिसांच्या अडीअडचणी
बाबत व आरोग्याची होत असलेली हेळसांड, या सर्वांगीण विषयावर शासन स्तरावर करण्यात आलेल्या मागण्या आणि सेवानिवृत्त पोलिसांच्या या महासंघटनाचे होत असलेले फायदे यावर संस्थेचे महासचिव महादेव पवार यांनी सभासदांना सभेमध्ये सविस्तर मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव वर्धापन दिनानिमित्त होत असलेल्या या मेळाव्यास,संबोधित करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील, सर्व जिल्ह्यांच्या संघटना, या शिखर संस्थेच्या रूपाने एकत्र आलेल्या आहेत, म्हणून या संघटित शक्तीच्या जोरावर आम्हाला आमचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवावयाचे आहेत.

आश्वासित प्रगती योजने सारखी ,चांगली योजना लागू होऊनही आमचे अनेक सेवानिवृत्त व कार्यरत पोलीस या योजनेपासून वंचित आहेत.
सेवानिवृत्तीनंतर मेडिकल सुविधा सेनादलाप्रमाणे टोल माफी,सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तीचे सर्व देय लाभ देणे, श्रेणी psi यांना व 1/1/2016 नंतर 30 वर्ष नियमीत सेवा करुन सेवानिवृत्त झालेल्या बांधवांना s14 नियमीत psi पदाची वेतन श्रेणी मिळणे जरुरीचे आहे. वैगेर अनेक प्रलंबित प्रश्नासाठी मा पोलीस महासंचालक कार्यालयात बैठक घेउन चर्चा केलेली आहे

S14 चे नियमीत psi पदाचे वेतन श्रेणीचे लाभ मिळणेसाठी वेळप्रसंगी लवकरच शिखर संस्था न्यायालयीन लढाई करण्याच्या तयारीत आहे .
पोलिसांचे ड्युटीचे तास आठ तासापेक्षा जास्त असल्याबाबतचा कोणताही शासन निर्णय अथवा स्थायी आदेश निर्गमीत नसलेची माहीती अध्यक्ष संपत जाधव यांनी माहिती अधिकारात मिळवलेली आहे .

कार्यरत पोलीस बांधवांचे ड्युटीचे तास आठ तास करावेत अथवा त्यांना जादा कामाचा मोबदला मिळावा तसेच सेवानिवृत्त पोलिसांनी यापूर्वी केलेल्या 24 तास किंवा बारा तासापेक्षा जास्त कामाचा मोबदला मिळवण्यासाठी शिखर संस्था सर्व संबधितांशी पत्र व्यवहार करुन आठ तासापेक्षा जादा कामाचे मोबदल्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु करण्याचे तयारीत असले बाबत व आपल्या सेवानिवृत्तांना आपल्या हक्काच्या न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी व न्यायालयीन पातळीवर लढा देणेसाठी राज्यातील सर्व शिखर संस्थेचे प्रतिनिधी असलेल्या ,सर्व संघटनांनी तयार राहावे असेयावेळी संपतराव जाधव यांनी राज्यातील सर्व सभासदांना निक्षून सांगितले.
तसेच पोलिसांचा आवाज मंत्रायलात घुमण्यासाठी राज्यातील पोलीस बांधवानी आपले विभागातील पदवीधर मतदार संघात आपले पोलीस पाल्य व पोलीस बॉईज संघटनांनी आपले मतदार यादीत नाव नोंदवलेस निश्चित पोलीसांचा पदवीधर आमदार निवडुन येऊ शकेल. यासाठीआपण घटनेने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावणेसाठी, आपले पदवीधर मतदार संघात नाव नोंदणी करणेचा सल्ला दिला .
राज्यातील वकील बांधव व पोलीस बांधव एकत्र आलेस वकील बांधव व पोलीस बांधवाचा पदवीधर उमेदवार निश्चित निवडुन येईल असे ही संपतराव जाधव यांनी निक्षून सांगितले.

शिखर संस्थेच्या या वर्धापन सोहळ्यासाठी, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र उमाप आवर्जून उपस्थित होते. राजेंद्र ऊमाप, यांनी राज्यातून आलेल्या सेवानिवृत्तांच्या प्रतिनिधी समोर आपल्या अनमोल मार्गदर्शन भाषणामध्ये बोलताना सांगितले की,
पोलीस दल असे आहे की,
कोणतीही रजा सुट्टी अथवा विश्रांती याची पर्वा न करता जनतेच्या सेवेत कार्यरत असतो. आवश्यक सोयी सुविधा न मिळाल्यामुळे
त्याच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड होऊनही शासनाच्या सोयी सुविधा त्याला मिळत नाही . पोलिसांच्या सर्व प्रकारच्या न्याय हक्कासाठी व न्यायालयीन प्रक्रिये साठी बार असोशियन कडून राज्यभर आवश्यक साह्य केले जाईल असे आश्वासन, बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ऊमाप यांनी या मेळाव्यामध्ये दिले ,शिखर संस्थेचे घटणेचा उद्देश खुप चांगला व समाज ऊपयोगी आहे. वकिल म्हणून मी आवर्जुन संस्थेची घटना वाचली आहे.राजेंद्र ऊमाप यानी शिखरच्या ध्येय धोरनाची स्वताचे भाषणात संस्थेची प्रशंशा केली व त्याचे वाचन करुन राज्याचे पदाधिकारी यांना अनमोल मार्गर्शन हि केले .या प्रशंसेमुळे राज्यातील सर्व पदाधिकारी भारावुन गेले.

शिखर संस्थेच्या या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पुणे शहर पोलीस दलातील, अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सेवानिवृत्त पोलिसांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले की, जेव्हा निवृत्त पोलिसांच्या
पदोन्नती बाबतचे व पेन्शन बाबत चे त्यांच्या अखत्यारीत असलेल्या प्रशासकीय बाबीवर लक्ष देऊन सर्व प्रकरणे वेळेत मार्गी लावली जातील व पुणे शहरातील सेवानिवृत्ती नंतरचे सर्व लाभ सेवानिवृत्तीच्या दिवशी दिले जातील, याशिवाय सेवानिवृत्त पोलिसांच्या संघटनांना जी काही मदत लागेल यासाठीही प्रशासना कडून साह्य केले जाईल असेही आवर्जून सांगितले.

सदर सोहळ्यासाठी पुणे पोलीसांच्या न्याय मागण्या ला वाचा फोडण्यासाठी पुण्याचे पत्रकार मनोज खोपडे , विनोद मुथ्था, सुभाष बनसोडे आवर्जुन उपस्थित होते. संस्थेचे वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
वर्धापन दिनाच्या मेळाव्यासाठी,मुंबई,सातारा सांगली, सोलापूर, जळगाव, धाराशिव,रायगड नाशिक,पुणे,नंदुरबार, पुणे रेल्वे,मुंबई रेल्वे, नंदुरबार,पुणे ग्रामीण, कारागृह विभाग अशा विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी हजर होते.
तसेच पुणे अध्यक्ष पदमाकर घनवट , पुणे रेल्वे अध्यक्ष मापारि, उपाध्यक्ष श्रिरंग लंघे ,कर्डिले ,कारागृह अध्यक्ष ,पुणे ग्रामीण पदाधिकारी व संस्थेचे पुणे विभागाचे पदाधिकारी, सखाहरी शेळके, शरदराव पवार,सदाशिव भगत, सुरेश राव शेळके ,शरद भोंगाळे, कैलास ढेरे ,पदमाकर घनवट ,प्रकाश लंघे , कामठे, फत्तेसिंग गायकवाड , मधुकर बाळगळ, साहेबराव वाघमारे , यांचे विशेष सहकार्य लाभले.

हा सोहळा संपन्न करण्यासाठी
संस्थेचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, संतोष सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांचाही संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.वर्धापन सोहळा अतिशय उत्साहात व दिमाखात पार पडला .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहराचे कार्याध्यक्ष शरदराव पवार यांनी केले व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर झुंरूंगे साहेबांनी उपस्थितांचे आभार मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 5
Users Today : 9
Users Yesterday : 9