चैतन्य सद्गुरु योगीराज श्री शंकर महाराज यांचा ७७ वा समाधी दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
सालाबादप्रमाणे वैशाख शुद्ध अष्टमी,बुधवार दि.१५ मे रोजी तिळवण तेली समाज मारुती मंदिर, मुंबई बाजार, शिरूर येथे, चैतन्य सद्गुरु योगीराज श्री शंकर महाराज यांचा ७७ वा समाधी दिन सोहळा साजरा कऱण्यात आला.
या १७ वर्षा व्या निमित्त विविध अनेक कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.भक्तिगंधर्व श्रीमुकुंद बद्रायनी ,पुणे यांचा सुश्राव्य भक्ती संगीताचा कार्यक्रम तसेच प्रदीपशेठ गादिया यांच्या श्रवणीय स्वरात श्रीं चे पोथी वाचन व प्रवचन करण्यात आले ,त्या नंतर श्रींची आरती करण्यात आली.
चैतन्य सद्गुरु योगीराज श्री शंकर महाराज यांचा ७७ वा समाधी दिन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शंकर महाराज भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला .

सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री चैतन्य सदगुरू शंकर महाराज सेवा प्रतिष्ठान, शिरूर व समस्त भक्त परिवार च्या वतीने करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी प्रितेश गादीया,निलेश नवले,महावीर कोठारी,हरिष भोगावडे, विनोद भालेराव,रवी वर्मा,हेमंत गादीया,चैतन्य खेडकर,भरत गाडेकर,नवकार कोठारी,राहुल बोथरा,बाळु‌ कर्नावट,लौकीक बोरा,संदीप पंधरकर,सुनील चौधरी,संतोष पवार,रोशन बाफना हितेश शहा,विकास सुराणा,करण खांडरे,संदीप गादीया,लोकेश चोपडा, नवनाथ जाधव,विजय नरके,अमित कोठारी,विकास पतंगे,अमित गादीया वैभव जोशी,राहील शेख,यांसह आदींनी परिश्रम घेतले.

ह्यावेळी शिरूर पोलीस स्टेशन चे पी आय गुंजवटे, देशमाने साहेब, काळे साहेब,भारतीय जनता पार्टी चे नेते व पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. जिल्हा परिषद सदस्य राहूल दादा पाचर्णे,भारतीय जनता पार्टी राष्ट्रिय सदस्य ऍड धर्मेंद्र खांडरे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष शितोळे,राष्ट्रवादी काँग्रेस चे अविनाश मल्लाव, जैन समाज शिरूर चे संघपती भरत चोरडिया,जैन कॉन्फ्रेंस मुंबई पंचम झोन अध्यक्ष सुनील बाफना,पत्रकार सतीश धुमाळ,पत्रकार संतोष शिंदे,पत्रकार डॉ.नितिन पवार, पत्रकार सचिन जाधव,पत्रकार भगवानमंदिलकर,तर्डोबाची वाडीच्या माजी सरपंच वर्षा ताई काळे,अनघा ताई पाठकजी,रश्मी ताई क्षिरसागर,वैशाली ताई ठुबे,पूजा ताई चोंधे,गुणाट चे माजी सरपंच माऊली भैरट,राजु शेख,अशोक गाजरे यांसह पुणे नगर मुंबई येथिल भक्त उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलासजी गोसावी यांनी केले तर आलेल्या सर्व भक्तांचे आभार मितेश गादीया यांनी मानले.हया वेळी २५०० हून अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असे प्रितेश गादीया यांनी सांगितले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 6 6
Users Today : 0
Users Yesterday : 9