शिरूर प्रतिनिधी :
पेठवडगांव (ता.हातकणंगले) येथे हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील दादा माने यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रचार मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात रामोशी बेडर बेरड समाजातील पुरुषानं पेक्षा महिला वर्ग जास्त उपस्थित राहून, आपण हि या प्रचार सभेत माघे नसून, आमच्या साठी संपूर्ण महाराष्ट्र फिरणारे व वेळोवेळी मंत्रालयात आपल्या समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वणवण करणाऱ्या व बऱ्या पैकी मागण्या पूर्ण करून घेणाऱ्या दौलत नाना शितोळे यांच्या बरोबर आम्ही आहोत व त्यांनी सांगावे व आम्ही ऐकावे हे दाखवून दिले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांत प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती झाली ,असुन त्यांना पुन्हा बहुमताने पंतप्रधान करण्यामध्ये रामोशी समाजाने देखील खारीचा वाटा उचलायचा आहे. तसेच विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील दादा माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी केले.
यावेळी माजी खासदार निवेदिता माने (वहिनी),जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना उमाजी शितोळे,
गोकुळ दूध संघाचे माजी संचालक विश्वास जाधव (नाना), धैर्यशील माने, जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य महिला अध्यक्ष कोमलताई चव्हाण,
वारणा साखर कारखान्याचे संचालक काकासो चव्हाण,
अजय पाटील,सुहास देसाई,जयसिंग चव्हाण, भारत नाईक,दादासो नाईक
,बाबासो मंडले,सुधीर दादा नाईक, यशोदाताई नाईक,
राजवीर मदने, विशाल नाईक,सिंधुताई मंडले,
दादासो मंडले, पूनमताई मंडले ,यांच्यासह रामोशी बेडर बेरड समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Users Today : 11
Users Yesterday : 9