शिरूरमधील मनसेचे काही कार्यकर्ते म्हणजे, बोलतात एक ,करतात एक……

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधि :
शिरूर शहरातील मनसे कार्यकर्ते कायमच काही तरी करत चर्चा करून “मी कसा वेगळा” व “मी जर पक्षात नसेल तर”? हि गुर्मी भासवत असल्याची चर्चा तर ईथुन माघे भरपूर होती.
पण आता तर हद्द पास केली, या कार्यकर्त्यांनी, म्हणतात ना बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना तशी यांची गत झाली आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचे सांगितल्यानंतर मागील आठवड्यात शिरूर मधील मनसे कार्यकर्ते वाघोली येथे आढळराव पाटील यांच्या कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित राहून आम्हीही महायुती आहोत व गेल्या काही दोन-तीन दिवसांपूर्वी शिरूर मध्ये महायुतीचे आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत पदयात्रा निघाली असताना शिरूर मधील मनसे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महायुती बरोबर आम्ही आहोत असे दाखविले.
महायुतीची पदयात्रेची चर्चा शिरूरमध्ये होत असताना व मोठ्या मताधिकाने आढळराव दादा यांना इतरांसारखे आपणही मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा मानस ठेवणारे मनसे चे कार्यकर्ते दि.24/04/2024 अमोल कोल्हे यांच्याही पदयात्रेत सामील असल्याचे दिसले.
याचा अर्थ शिरूर नागरिकांनी व मतदानकर्त्यांनी काय घ्यावा? हे कार्यकर्ते नेमके कोणत्या पक्षाचे? शिरूर मधील कार्यकर्ते खरंच राज ठाकरेंचा आदेश मानणारे आहेत का? असे व इतर अनेक प्रश्न कालच्या अमोल कोल्हेंच्या पदयात्रेच्या रॅली मधून उपस्थित झालेले आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 8
Users Today : 12
Users Yesterday : 9