
गेल्या पंधरा वर्षांपासून जय मल्हार क्रांती संघटना काम करत आहे. गेल्या पंधरा वर्षांत सोळा लोक सभेचे मतदार संघ व ३६आमदारकीचे मतदार संघा वरती फोकस करत, ती पूर्ण माहिती महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री फडवणीस यांना देत , संपूर्ण महाराष्ट्रात बेरड, बेडर, रामोशी समाज जवळ जवळ ८०लाख असल्याचे समजले.
या बेरड बेडर रामोशी समजला अनेक बहुजन समाज म्हणजेच धनगर समाज, मातंग समाज, भिल समाज, पारधी समाजातील अनेक लोक , जय मल्हार क्रांती संघटने मध्ये पदाधिकारी आहेत या सर्वांना एकत्रित करत एक ताकद महाराष्ट्रत निर्माण करायची होती व ती आम्ही दाखवून देते त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला घटक पक्षात सामील करून घ्यावे असे आदेश महाराष्ट्राचे समन्वय समितीचे अध्यक्ष लाड यांना देऊन जय मल्हार क्रांती संघटना यांना घटक पक्षात घेतले. त्यावेळेस कोणत्याही अटी शर्ती देण्यात मागण्यात आला नाही. कारण वर्षानुवर्ष अनेक मागण्या होत्या त्या आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसअसताना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पासून ज्या मागण्या होत्या ,त्या त्यांनी बऱ्यापैकी मान्य केल्या आहेत. त्यामुळे जय मल्हार क्रांती संघटना महायुती आहे.
सौ. सुनेत्राताई अजित दादा पवार यांचा पुणे येथील कलेक्टर ऑफिसला उमेदवारीचा अर्ज भरण्यात आला..
महायुती असताना त्यांनी कोणताही शब्द आम्हाला दिला नाही व आम्हीही कोणताही शब्द मागितलेला नाही कारण रामोशी बेडर बेरर हा समाज खूप इमानदार आहे व आम्ही खूप निस्वार्थीपणे काम करून त्यांना निवडून देणार आहोत.
आमचा समाज हा खूप निस्वार्थीपणाने काम करत आहे हे त्यांना कामातून दाखवून देणार आहोत व आता जे 16 मतदारसंघ आम्हाला देण्यात आले आहे तेथे रोज मीटिंग व हजारो लोकांच्या सभा घेत आम्ही त्यांना आमच्यातील एकी व निस्वार्थी काम करण्याची ताकद दाखवून देत आहोत, असे जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.






Users Today : 12
Users Yesterday : 9