स्वराज्य रक्षक फाऊंडेशन व निर्वि ग्रामपंचायत यांच्या वतीने प्रथमतच महिलांसाठी मोफत प्रशिक्षण..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील निर्वि येथे गेली पंधरा वर्षांत पहिल्यांदाच महिलान साठी मोफत आरी वर्क व टेलरींग चे प्रशिक्षण देण्यात आले.

स्वराज्य रक्षक फाउंडेशन महिलांच्या प्रगती साठी कायम प्रयत्नशील:

स्वराज्य रक्षक फाउंडेशन गेली अनेक वर्ष महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्वच महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाहीत , कारण त्यांच्या वर अजून ही जबाबदाऱ्या असतात व घरात पैसा ही लागतो ,म्हणून स्वराज्य रक्षक फाऊंडेशन चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी हे महिलांना घरात राहून कसे पैसे मिळतील यासाठी कायम प्रयत्नशील असतात.त्यांच्या अंगात टेलरिंग,आरी वर्क,पार्लर व इतर अनेक प्रशिक्षण देऊन ,त्यांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करत असतात.

विद्यमान सरपंच मनीषा शरद पवार या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या:

निर्वि गावच्या विद्यमान आदर्श सरपंच मनीषा शरद पवार व इतर ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आरी वर्क व टेलरिंग चे प्रशिक्षण देण्यात आले.यात आरी वर्क चे प्रशिक्षण घेणाऱ्या जवळजवळ 30महिलांना सर्व साहित्य मोफत देण्यात आले व टेलरिंग चे प्रशिक्षण घेणाऱ्या 30 महिलांना ही साहित्य मोफत देण्यात आले.

शेती व घरातील जबाबदारी सांभाळत महिलांची  शिकण्याची जिद्द पूर्ण :

जवळ जवळ दीड-दोन महिने प्रशिक्षण कालावधीत या सर्व महिला घरातील कामे करून,शेती ही करत होत्या,खऱ्या अर्थाने या खेड्यातील महिलांनी शिकण्याची जिद्द काय असते ,हे दाखवून दिली असल्याची माहिती स्वराज्य रक्षक फाउंडेशनच्या अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी ,सर्टिफिकेट वाटप करताना सांगितली.

या सर्टिफिकेट वाटप कार्यक्रमच्या वेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या निर्वि गावच्या आदर्श सरपंच मनीषा शरद पवार यांनी,या प्रशिक्षण घेणाऱ्या महिला फक्त निर्वि गावातील नसून,शेजारील वाड्या वस्ती मधून चालत येऊन शिकण्याची जिद्द पूर्ण करत असल्याचे सांगितले,अशा जिद्दी व मेहनतीने पुढे जाणाऱ्या महिलांच्या आपण कायम पाठीशी आहोत व पुढे ही महिलांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


या कार्यक्रमाच्या वेळी सोनल जगताप,जयश्री सोनवणे यांनी आपल्या गावात प्रथमच महिलांच्या हितासाठी असा उपक्रम राबविण्यात आला असून आम्ही सर्व महिला सरपंच मनीषा पवार व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे विशेष आभारी आहोत व पुढील काळात ही असेच प्रशिक्षण देण्यात यावे जेणे करून आम्हाला निदान आमची सर्व कामे करत काही पैसे कमवता येतील व अमच्या संसाराला हातभार लावता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.


या कार्यक्रमाच्या वेळी विद्यमान सरपंच मनीषा पवार,मा.आदर्श सरपंच तात्यासाहेब सोनवणे,शरद पवार ,ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री बुराडे,प्रमोद राजगुरव,अंजली साळुंके,पत्रकार शकील मनियार,टेलरिंग प्रशिक्षण देणाऱ्या जोती पाटील मॅडम आरी वर्क चे प्रशिक्षण देणाऱ्या दिव्या काळे मॅडम व स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 5 1 7 2
Users Today : 97
Users Yesterday : 77