शिरूर नगर परिषदेकडून वृक्षारोपण…… बक्षिश वितरण……

Facebook
Twitter
WhatsApp

स्वच्छ सर्वेक्षण २०२५
शिरूर प्रतिनिधी:
माझी वसुंधरा अभियान ६.० शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर नगरपरिषद हद्दीतील गोलेगाव रोड वर असणाऱ्या,शासकीय मुलींचे वसतीगृह या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बांबू, चिंच, कौठ, चिक्कु, जांभूळ असे एकूण २३७ झाडे लावण्यात आली.
तसेच शिरूर नगरपरिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत घेण्यात आलेल्या वेस्ट टू वंडर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम ही यावेळी घेण्यात आला.

टाकाऊ पासून टाकाऊ:

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत शाळांमध्ये वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत शाळांना टाकून दिलेल्या साहित्यापासून उदा. टायर, प्लास्टीक बाटली, दोरी, पुठ्ठा, लाकुड इत्यादी वस्तुंचा वापर करून सुंदर कलाकृती , देखावा तयार करायचं होता. या स्पर्धेमध्ये एकूण ०७ शाळांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले आहे. त्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकिट तर सहभाग सर्व शाळांना सर्टिफिकिट देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित होते:

सदर कार्यक्रमास शासकीय मुलींचे वसतीगृहाचे अधीक्षक श्रीम. वैशाली सटाले, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील, आर.एम. डी. इंग्लिश मिडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीम. अश्विनी घारु , विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. ज्योती मुळे ,शिरूर नगरपालिका शाळा क्र. ०१ च्या मुख्याध्यापिका, शिरूर नगरपालिका शाळा क्र. ३ चे शिक्षक व विद्यार्थी शिरूर नगरपालिका शाळा क्र. ६ चे शिक्षक व विद्यार्थी, जीवन विकास मंदिर चे शिक्षक व विद्यार्थी, व्हिजन इंटरनॅशनल स्कूल चे मुख्याध्यापक संतोष येवले, शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, कर निरिक्षक माधव गाजरे, नगररचना सहाय्यक पंकज काकड, सहा. कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे, लेखापाल अंकुश इचके, अंतर्गत लेखापरिक्षक दत्तात्रय टोपे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, विद्युत अभियंता तेजस शिंदे, सहा. कार्यालयीन अधीक्षक श्रीम. शितल काळे, स्थापत्य अभियंता श्रीम. शामली लाड, भूषण कडेकर, चंद्रकांत पठारे, अनिल चव्हाण, मिठ्ठू गावडे, शहर समन्वयक श्रीम. प्राची वाखारे, प्र. स्वच्छता मुकादम मनोज आहिरे, किरण जाधव, गणेश शेंडगे, मनोज शेळके, श्रामशरण आडोळे, महेश लोळगे, स्वप्नील तरटे, सागर बडगुजर, गौरव कुलथे, श्रीम. नीता जाधव, नगरपरिषदेचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 5 0 8 4
Users Today : 9
Users Yesterday : 77