शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरात काही महिन्यांपूर्वी,वर्षा पूर्वी झाड तोडले की,सामाजिक कार्यकर्ते निवेदन, आंदोलन वेळ प्रसंगी तर आमरण उपोषण करत होते.
तेच कार्यकर्ते विद्याधाम शाळेच्या गेट समोर असणारे एवढे मोठे व जुने झाड छाटले गेले तेव्हा गायब आहेत.
महावितरण कार्यालयाने जरी ते छाटले असेल तरी त्यांना विजेच्या तारा दुसऱ्या मार्गाने घेऊन जाता येऊ शकते ,पण झाड तोडून दुसरीकडे लावणे शक्य नाही.
उन्हाळ्यात याच झाडाखाली शाळेची मुले,छोट्या मोठ्या गाड्या,पायी जाणारे नागरिक थांबलेले दिसतात.
विजेच्या तारा मुळे शहरातील सर्व झाडे तोडायची का?
[शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नेमके कुठे गेले?]
[काही वर्षापूर्वी पंचायत समिती मध्ये असेच झाड छाटण्यात आले होते…अंदोलन झाले…झाड छाटणारे व इतर अनेकाना शिक्षा झाली,मग आता या झाडाबाबत कुणी आवाज का उठवला नाही हे विशेष आणि उठवला तर शिक्षा नेमकी कुणाला होणार?]
