वडगावशेरी, पुणे प्रतिनिधी:चेतन पाटील
वडगावशेरी परिसरात खंडित मूर्ती, फोटो, प्रतिमा, नारळ आणि निर्माल्य यांचे योग्य पद्धतीने विसर्जन करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेत सर्व धर्मबंधु, वारकरी,स्वयंसेवक, बंजरंगी, साधक, शिवभक्त यांनी पुढाकार घेतला.
या मोहिमेंतर्गत वडगावशेरी परिसरातील सर्व मंदिरा बाहेरील जागा तसेच वड, पिंपळ यांच्या खालील भग्न, तुटलेल्या, खंडित अवस्थेत पडलेल्या मूर्ती, फोटो, प्रतिमा, नारळ, निर्माल्य यांची साफसफाई करण्यात आली.
यानंतर सर्व धार्मिक वस्तू श्रद्धेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने वाहत्या पाण्यात योग्य रीतीने विसर्जित करण्यात आल्या.
मोहिमेमागील हेतू:
हिंदू धर्माचा सन्मान राखणे,
खंडित किंवा खराब झालेल्या देव-देवतांच्या वस्तूंचे योग्य विसर्जन,मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता,पर्यावरण रक्षण,
नकारात्मकतेपासून मुक्तता हा होता.
नागरिकांना आवाहन:
मोहिमेदरम्यान नागरिकांना सांगितले गेले की, यापुढे कोणतीही खंडित मूर्ती, फोटो, प्रतिमा, नारळ किंवा निर्माल्य सार्वजनिक ठिकाणी, झाडाखाली, मंदिर परिसरात किंवा इतर ठिकाणी टाकू नये. अशा धार्मिक वस्तूंचे श्रद्धेने वाहत्या पाण्यात विसर्जन करावे.
यासाठी स्थानिक प्रशासनाची, धार्मिक संस्थांची मदत घ्यावी, तसेच पर्यावरणाची काळजी घेत नैसर्गिक साहित्य वापरावे, असे आवाहन करण्यात आले.
स्थानीय संघटना यांचा उत्स्फूर्त सहभाग:
या मोहिमेत वडगावशेरी परिसरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, हिंदू जनजागृती समिती, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जागरण, सनातन संस्था,शिववंदना महासंघ (वडगावशेरी, चंदननगर,खराडी प्रभाग),अखिल वडगावशेरी शिवजयंती उत्सव समिती यांचा सहभाग होता.
या मोहिमेत रोहित गलांडे, साईराज पवळे, आकाश देशपांडे, चेतन दिलीप पाटील, अमोल सपकाळ, सूरज कळसाईत, शुभम धुमाळ, निकेत देशमुख, आकाश गलांडे, अमित पिल्ले, शुभम गलांडे, निखिल मुळे, विशाल झिरमिरे सर्वांनी मंदिर परिसर स्वच्छ केला आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या जागांस्वच्छ करून हिंदू धर्म जागृती केली.
या सर्व हिंदू धर्मियांसाठी अंतिम आवाहन:
धार्मिक भावना आणि पर्यावरण यांचा समतोल राखत प्रत्येकाने जबाबदारीने व श्रद्धेने अशा वस्तूंचे योग्य ठिकाणी विसर्जन करावे. सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडांखाली मूर्ती, फोटो, प्रतिमा टाकणे टाळावे.
यामुळे परिसर स्वच्छ राहतो, धार्मिक परंपरा जपल्या जातात आणि नकारात्मकता दूर राहते.
“तुटलेल्या मूर्तींचा अनादर नको, हिंदू परंपरेनुसार पर्यावरणपूरक विसर्जन हवे”,
समाजात जागरूकता वाढवूया,प्रत्येकाने घरातील खंडित मूर्ती, फोटो, नारळ, निर्माल्य योग्य पद्धतीने विसर्जित करावे.तसेच यावेळी सर्व तरुणांनी हिंदू धर्माचे महात्म्य आणि माहिती देऊन सर्वांना पर्यावरणपूरक आणि धार्मिक पद्धतीने ह्या सर्व गोष्टी समजून सांगाव्यात.
