शिरूरप्रतिनिधी :
ता. शिरूर शहरातील एसटी स्टँड परिसरातून एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना समोर आली ,असून याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोठे लावली होती गाडी:
फिर्यादी सचिन नाना वायकर वय 28, व्यवसाय ,ड्रायव्हर, रा. सय्यदबाबा नगर, शिरूरयांनी दिलेल्या माहितीवरून, दि. 24 जून 2025 रोजी सकाळी 8.30 ते 8.45 च्या सुमारास त्यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (काळ्या रंगाची, पांढऱ्या पट्ट्यासह, गाडी नंबर MH-45/R-1693) ही दुचाकी शिरूर एसटी स्टँडजवळील जयराज हॉटेलसमोर लॉक करून लावली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने ती लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
सदर प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जगताप हे करत असून, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
शहरातील एसटी स्टँड परिसर हा प्रवाशांच्या वर्दळीचा भाग असून अनेक नागरिक तेथून नोकरी व्यवसायासाठी पुण्याकडे जात असतात. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत आहे.
नागरिकांची मागणी:
[नागरिकांनी आपली वाहने सुरक्षीत स्थळी आणि लॉक करूनच लावावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.]
