शिरूर प्रतिनिधी:
आ. माऊली कटके यांच्या विशेष प्रयत्नातून दि.१२/०६/२०२५ रोजी शिरूर येथे एस.टी. बससेवेचे लोकार्पण सोहळा पार पडला,तसेच आढावा दौऱ्याची यशस्वी सांगता आणि “संकल्पनेतील शिरूर” या उपक्रमाची महत्त्वाकांक्षी सुरुवात करण्यात आली आहे.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू करत, आजचा दिवस शिरूरवासीयांसाठी ऐतिहासिक ठरला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारच्या पाठबळाने, आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांतून शिरूर एस.टी. डेपोमध्ये नव्याने पाच एस.टी. बसेस दाखल झाल्या.
या बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
तसेच विविध विकास कामांचा आढावा दौरा आज त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
नवीन एस.टी. बसेस मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाचा दिलासा मिळाला असून,एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून शिरूर शहर व तालुक्यातील प्रवाशांना आता आधुनिक व वेळेवर चालणाऱ्या बससेवेचा लाभ मिळणार आहे.या नवीन बसेसमुळे खास करून शिरूरच्या ग्रामीण व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, महिला वर्गाला आणि नोकरदार नागरिकांना प्रवासात मोठा दिलासा मिळला आहे.
आ. माऊली कटके यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून या सुविधेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्वरित निर्णय घेतला. लोकार्पण सोहळ्यात आमदार कटके म्हणाले: “शासनाच्या सहकार्याने शिरूरसारख्या वाढत्या लोकसंख्येच्या शहराला ही सेवा मिळणे गरजेचे होते. ही सेवा म्हणजे केवळ वाहतूक नाही, तर ग्रामीण जनतेसाठी नवा दुवा आहे.”
नियोजित दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा ही दिवसभर आ. माऊली कटके यांनी शिरूर शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देऊन विकासकामांची प्रगती, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासनाच्या भूमिकेचा आढावा घेतला.
नगरपरिषद आढावा बैठक:
नगरपरिषद कार्यालयात झालेल्या बैठकीत शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नळपाणी योजना, रस्त्यांचे डागडुजी कामे, सांडपाणी निचरा इ. बाबींवर सविस्तर चर्चा झाली. अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कामांमध्ये गुणवत्ता आणि वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
त्याच बरोबर
