शिरूर प्रतिनिधी:
बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर येथील ग्रामपंचायत कडे ,दिनांक 3 जून 2025
स्वातंत्र्यसंग्राम मधील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी पहिल्या ब्रिटिश विरोधी जाहीरनाम्याचा ऐतिहासिक दस्तऐवज हा आजही गौरव आणि आठवत जातो ,याच ऐतिहासिक घटनेला उजाळा देत ,श्रीकांत स्वरूप खोमणे राहणार मांडवगण फराटा यांनी ग्रामपंचायती बाभुळसर बुद्रुक यांच्याकडे एक विशेष मागणी केली आहे.
पुढील पिढी करता महत्वाचे
त्यांच्या निवेदनानुसार राजे उमाजी नाईक यांनी बाभुळसर बुद्रुक येथे जाहीरनामा वाचून ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याचा उद्देश केला होता ,त्या ऐतिहासिक स्थळी एक स्मारक व वास्तू उभारण्यात यावी .
राजे उमाजी नाईक यांचे जाहीरनामे ,इतिहास ,स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान याची माहिती देणारे फलक उभरावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
खोमणे यांनी याबाबत सविस्तर निवेदन ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्याकडे दिले असून या कार्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .
निवेदना सोबतच :
त्यांच्या मते हे स्मारक गावाच्या गौरवात भर टाकणारे असून आगामी पिढीला इतिहासाची जाणीव करून देणारे ठरेल ,तसेच निवेदनासोबत जाहीरनामेची छायाप्रत आणि इंग्रज अधिकारी कॅप्टन मेकिंग टॉस याच्या डायरीतील संदर्भ जोडण्यात आले आहे .
गावकऱ्यांनी ऐतिहासिक स्मारक उभारण्याच्या मागणीचे स्वागत केले असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
