कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील श्री काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा २००४-०५ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच जल्लोषात पार पडला. तब्बल वीस वर्षांनंतर भेटलेल्या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.सरस्वती पूजन, केक कापणे, अनुभव कथन, फोटो प्रदर्शन व विविध उपक्रमांनी वातावरण भारावून गेले.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यात एकत्र उपक्रम राबवण्याचे संकल्प व्यक्त केले. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाला माजी शिक्षक ढोकले, विधाटे , करपे , तसेच मुख्याध्यापक खेडकर यांची उपस्थिती लाभली.अमोल मोरे व शितल देशमुख यांच्या पुढाकारातून पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून झाडांची रोपे वाटण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून,
आयोजनात दिपक भुजबळ, मंगेश नर्के, मंगेश काळोखे, रामदास गायकवाड, अमोल मोरे, राहुल मोरे, अमोल सासवडे, धनंजय पवार, तुषार देशमुख आदींचा मोलाचा सहभाग होता.प्रा.दीपाली लांडे, प्रा. कविता कडलक, सी.ए. शितल देशमुख, माया भुजबळ, अश्विनी सासवडे, अनिता गिलबिले, प्रियांका सोनवणे या माजी विद्यार्थिनींचाही सक्रिय सहभाग लाभला.हा स्नेहमेळावा जुन्या नात्यांना नवसंजीवनी देणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.
