स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन सभा ….

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
स्वराज्य रक्षकधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त स्वराज्य रक्षक फाउंडेशन यांनी बलिदान सभा आयोजित केली होती .

असा धर्म रक्षक महाराज होणे नाही.

या सभेचे प्रस्ताविक आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप यांनी केले ,तर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली अर्पण करत,येवढ्या कमी वयात ,येवढे मोठे काम करणारा राजा होणे नाही ,असे सांगत संभाजी महाराजांच्या कार्याची माहिती सांगत,त्या कार्या पुढे नतमस्तक झाले.

यावेळी जनता दलाचे संजय बारवकर ,सतीश धुमाळ ,प्रकाश थोरात ,माजी नगरसेविका मायाताई गायकवाड स्वाती थोरात यांनी मनोगत व्यक्त करत महाराजांच्या स्मृती ना उजळा दिला.

अमदाबाद गावचे माजी सरपंच प्रकाश थोरात यांनी आपल्या मनात लहान पणापासून असणारा गैरसमज आपल्या व सर्वांच्या मनातून अशा कार्यक्रमामुळे व अनेक चित्रपटांमुळे दूर झाले आहेत,म्हणून त्यांनी ही सभा आयोजित करणारे स्वराज्य रक्षक फाउंडेशन चे अध्यक्ष रवी लेंडे यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत,अशा सभा होणे गरजेचे आहे असे यावेळी सांगितले.

संभाजी महाराजांच्या बलिदानाची समाजाला ओळख झाली पाहिजे..

तर भविष्यात अशा आपल्या महापुरुषांच्या स्मरणार्थ व इतर ही समाजाला प्रेरणा देणाऱ्या कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन लेंडे यांना देत,आपण आपल्या बरोबर आहोत अशी भावना रवी बापू सानप यांनी व्यक्त केली.

मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद ,प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे ,मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड ,नितीन गायकवाड, लौकिक बोरा ,एल आर देशमुख ,हुडको कृती समितीचे शैलेश जाधव,आशिष भोजने ,मोरया प्रतिष्ठानचे तुषार मांडगे,किरण फलके,महेश सातकर,प्रवीण मापारी,राष्ट्रवादी (sp)युवक अध्यक्ष अमित शिर्के,शरद जामदार ,शिवसेनेचे नितीन जामदार ,बजरंग दल चे अजिंक्य तारू,शेखर भंडारी,आप्पासाहेब पठारे स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे शोभा परदेशी, नम्रता गवारे,प्रथमेश चाळके, प्रफुल उबाळे, शुभम जाधव, आदित्य घाटगे,शाम थोरात,सागर ढवळे,योगेश घोडेस्वार, संकेत जामदार ,निलेश पांडे क्रांतीसुर्य प्रतिष्ठान कुरुंद चे सतीश गायकवाड,लहू गायकवाड,आशिष उबाळे ,कैलास घाटगे ,सिद्धेश्वर बगाडे शंकर जामदार,उद्योजक संदीप बियाणी,राहुल निकुंभ,शशिकला काळे,सविता बोरूढे, माया गायकवाड,स्वाती थोरात,वैशाली गायकवाड,प्रीती बनसोडे,निर्मला ढोकले,सुजाता माथेकर,सुनीता डोंगरे ,छाया गायकवाड, डॉ. वैशाली साखरे व इतर अनेक पदाधिकारी व अनेक पत्रकार उपस्थित होत,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला फुले अर्पण करत अदरांजली अर्पण केली .

संभाजी महाराजांचे विचार समजात रुजने गरजेचे…

तसेच स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे सर्वेसर्वा,संस्थापक अध्यक्ष रवी लेंडे यांनी महाराज्यांची किर्ती सांगत,असे महापुरुष होणे नाही म्हणून आपण सर्वांनी निदान त्यांचे विचार आपल्या समाजात रुजवावे असे सांगत,अभिवादन करत सभेची सांगता केली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115