पुणे प्रतिनिधी:सागर पवार
जागतिक महिला दिनानिम्मित महा एनजीओ फेडेरेशन आयोजित “राजामाता जिजाऊ पुरस्कार 2025” हा पुरस्कार महा. एन. जी. ओ. फेडेरेशन चे अध्यक्ष, महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष मा. शेखरजी मुंदडा व सौ स्वातीजी मुंदडा यांच्या हस्ते भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस व स्मितसेवा फाउंडेशन अध्यक्षा सौ स्मिताताई तुषार गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
शेखर भाऊ सारखे चांगली सामाजिक नेतृत्व करणारे नेते मंडळी आहेत म्हणूनच आम्ही च्या सारख्या महिलांना कौतुकाची थाप मिळून आम्हाला कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आज राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळवून माझी समाजाप्रती असलेली जबाबदारी वाढली असून या पुढे नक्कीच अजून जास्त प्रयत्न करून काम करण्याचा प्रयत्न करेल. यावेळी महा एन जी ओ संस्थेचे अधिकारी मुकुंद शिंदे, विजय वरुडकर उपस्थित होते.






Users Today : 0
Users Yesterday : 9