शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील सेंट चावरा स्कूल ला मराठी माध्यमाची परवानगी असताना सन २०१६ पासून इंग्लिश मीडियम माध्यमाने चालवत असल्याची बाब मनसे पुणे जिल्हा उपअध्यक्ष महिबूब सय्यद,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे,शिरूर तालुका अध्यक्ष अदित्य मैड,शिरूर तालुका सचिव रवी लेंडे व शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी ६/०२/२०२५ रोजी लेखी तक्रार करत उघड केली होती.
त्यांनतर दि.12/02/2025 रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरूर यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक )पुणे जिल्हा परिषद पुणे यांना कोणती,कारवाई करावी यासाठी मार्गदर्शन होण्यासाठी पत्र दिले होते.
दि.27 /02 /2025रोजी शिक्षण शिक्षणाधिकारी(प्राथमिक ) पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरूर यांना मार्गदर्शन सूचना दिल्या.
दिनांक 11 /03/2025 रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरूर यांनी सेंट चावरा शाळा बंद करण्याचे व फौजदारी गुन्हा दाखल करावा व 2016 ते आज रोजी पर्यंत मराठी मिडीयम परवानगी असताना इंग्लिश मीडियम शाळा चालवल्याबद्दल प्रति दिवस 1000 रुपये प्रमाणे एक लाखाचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे व शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ही शाळा चालू राहिल्यास प्रति दिन दहा हजार रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याचे माहिती महिबुब सय्यद यांनी दिली.
