कारेगाव (प्रतिनिधी): कारेगाव तालुका शिरूर येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. विधी संघर्षित मुलगा वय 16 या मुलाने पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर तिला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेने कारेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच कारेगावात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती आणि आता पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने महिला वर्ग भयभीत झाले आहेत.
कारेगावात नक्की काय चालले आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधी संघर्षित मुलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित मुलीशी ओळख वाढवली. त्यानंतर तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी विधी संघर्ष बालक याच्याविरुद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले करत आहेत.






Users Today : 1
Users Yesterday : 9