रांजणगाव प्रतिनिधी
कारेगाव येथे राहत असलेल्या व ( मूळ रा. पखरुड ता.भूम जि. धाराशिव ) ,येथील एकाच कुटुंबातील सदस्यांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.
त्यानुसार रांजणगाव पोलीसांनी कारवाई करत त्या महिलेच्या पती व सासू हिस अटक करून मे.कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. सदरचे बाबत सरकारी वकील यांनी सरकार ची बाजू मांडत संबधित आरोपींना न्यायालयीन कोठडीत देण्यासाठी युक्तिवाद केला असता मे.कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर आरोपींनी त्यांची बाजू मांडणे साठी अँड.शुभम सोपान कावळे यांच्या मार्फत पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी सदर आरोपी यांचा या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचा प्राथमिक सहभाग दिसून येत नाही, असा युक्तिवाद अँड .शुभम सोपान कावळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांचे समोर केला व संबधित गुन्ह्यात सदरचे आरोपी यांचा सहभाग नाही हे मे.कोर्टाचे निदर्शनास आणून देत आरोपी पक्षाची बाजू मांडली.
सदरचा युक्तीवाद एकल्यानंतर व दोन्हीं बाजू समजून घेतले नंतर सदरचे बाबत न्यायालयाच्या निदर्शनास काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थीत झाले नंतर मे. जिल्हा व सत्र न्यायालय यांनी आरोपी पक्षाच्या बाजूने निकाल देत मे. कोर्टाचे न्यायाधीश यांनी दोघांचाही जामीन अर्ज मंजूर केला आहे. यावर आरोपी पक्षाच्या वतीने ॲड. शुभम सोपान कावळे युक्तीवाद करत त्यांचा जामीन देऊन त्यांची कारागृहातून सुटका केली..






Users Today : 0
Users Yesterday : 9