सरदवाडी प्रतिनिधी:दतात्रय कर्डी ले
[मंत्रालयीन स्तरावरून निधी खेचुन आणत सामाजिक कार्यातून अल्पावधीत छाप सोडणाऱ्या तृप्ती सरोदे यांनी जिल्हा परिषद लढववावी]
राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचे वार वाहू लागले आहे. लाडकी-बहीण योजनेची तळागाळापर्यंत अंमलबजावणी केल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर महायुतीकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी केली जाणार हे नक्की आहे.
याचीच तयारी म्हणून थोड्याच दिवसांमध्ये उमेदवारांच्या चाचपणी विषयी अंदाज घेतला जाऊन विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आमदारांना मताधिक्य देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या गावांवर लक्ष दिले जाईल.
न्हावरा जिल्हापरिषद गटाचा विचार केल्यास या गटात महायुती कडून राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव तृप्ती सरोदे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. मागील ४ वर्षांपासून सरदवाडी आणि न्हावरा जिल्हापरिषद गटातील रामलिंग गावाला २१ लाख, गोलेगावला २१ लाख, मोटेवाडीला साडे दहा लाख निधी जिल्हा नियोजन च्या माध्यमातून देण्याचं काम केलेलं आहे तसेच सरदवाडीत महाआरोग्य शिबीर, महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम,अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आणि अशा वर्कर्स ना साडी चोळी आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं होत, तसेच वृषारोपण, गणपती उत्सवाच्या माध्यमातून महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणावर केल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महिलांना अग्रक्रमाने प्रधान्य देण्याविषयीं महायुतीत विचार होण्याची शक्यता आहे. यामध्ये तृप्ती सरोदे यांच्यासारख्या सुशिक्षित तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व स्तरावर ऍक्टिव्ह असणाऱ्या महिलेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
तृप्ती सरोदे या राष्ट्रावादी महिला प्रदेश सचिव म्हणून काम करत आहेत त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,खा. सुनेत्रा वहिनी पवार,मंत्री आदिती ताई तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर तसेच इतर मंत्री आमदारांसोबत चांगले संबंध असल्याकारणाने जिल्हा परिषदेमध्ये काम करताना देखील भरीव निधी त्यांच्या माध्यमातून आणला जाईल अशी चर्चा न्हावरा जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये आहे. शिरूर तालुक्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील त्यांचा आदर आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच असणाऱ्या भाजपमधील नेत्यांसोबत देखील तृप्ती सरोदे यांचे चांगले संबंध आहेत म्हणूनच तृप्ती सरोदे यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिराला भाजप नेते प्रदीप दादा कंद तसेच भाजपचे सर्व नेते उपस्थित होते आपण पाहिलेलं आहे. म्हणूनच यंदा सौ तृप्ती सरोदे यांनी न्हावरा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी अशी चर्चा लोकांमधून होताना दिसत आहे.तृप्ती सरोदे यांनी निवडणूक लढवल्याची तयारी दाखवल्यास न्हावरा जिल्हा परिषद गटाला सक्षम आणि सुशिक्षित महिला प्रतिनिधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
