शिरूर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अडीच
वर्षांपासून सगळे चुकीचे राजकारण चालले आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घटना घडल्या, उलथापालथ झाली, त्या काळात मी निष्ठेने शरद पवार यांना साथ दिली. याचा बदला म्हणून मला, माझ्या कुटुंबाला व माझ्या घोडगंगा कारखान्याला खूप त्रास दिला; परंतु काही झाले, प्रसंगी जीव द्यायची वेळ आली, तरी मी शरद पवार साहेबांना सोडणार नाही म्हणजे नाही, असा निर्धार शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी येथे व्यक्त केला.
शिरूर हवेली विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी
समाधिस्थळावरील श्री संगमेश्वर मंदिरात आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अशोक पवार यांनी निवडणूक प्रचारार्थ पेरणे येथे भेट दिली असता, पेरणे फाटा, तापकीर वस्ती परिसरामध्ये आमदार अशोक पवार यांची बैलगाडीमधून मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले.
विकासकामात राज्यात अशोक पवार यांचा हात कोणी धरू शकत नाही. लोकांची सेवा करणारा आमदार आहे, राज्यातील शिवसैनिक वाट पाहते होते, ते नक्कीच विरोधकांना त्याची जागा दाखवतील. सर्व शिवसैनिक अशोक पवारांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दौलत पायगुडे यांनी सांगितले.






Users Today : 2
Users Yesterday : 9