वाचन संस्कृती रुजवण्यासाठी दिवाळी अंकाचा साहित्य फराळ भेट द्यावा

Facebook
Twitter
WhatsApp

*वाचन संस्कृती रुजवण्यासाठी दिवाळी अंकाचा साहित्य फराळ भेट द्यावा*
-पुण्यातील अक्षरधारा येथे सचिन बेंडभर पाटील यांचे प्रतिपादन
ता.30 ( पुणे प्रतिनिधी)
महाराष्ट्रात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मराठी वाचकांनी एकमेकांना दिवाळी अंकाचा साहित्य फराळ भेट म्हणून द्यावा, असे प्रतिपादन पुण्यात अक्षरधारा बुक गॅलरी येथे प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या निमित्ताने पुण्यात अक्षरधारा बुक गॅलरी येथे वाचकांची पावले दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी वळत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने विनोदी अंक, सामाजिक अंक, बाल अंक, भय कथा, रहस्य कथा, गुढी कथा असलेले अंक, शृंगारिक अंक किंवा एखादा विशिष्ट विषय घेऊन दिवाळी अंक बाजारात आले आहेत. ते खरेदी करण्यासाठी वाचकांची पावले ग्रंथ दालनात वळत आहेत. परंतु यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आल्याने मराठी वाचकांची संख्या वाढली पाहिजे. आपली संस्कृती आपणच टिकवली पाहिजे. त्यासाठी मराठी वाचकांनी एकमेकांना दिवाळीचा साहित्य फराळ म्हणून दिवाळी अंक भेट द्यावा व वाचन संस्कृती अधिकाधिक वृद्धिंगत करावी, असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावर्षी जत्रा, फिरकी, धमाल धमाका, महाराष्ट्राची जत्रा, अनुरव, संस्कृती,संवाद , व्यासपीठ, खतरनाक, शब्दकुसुम, शुभम, अपेक्षा, धुळपेरनी, कादवा शिवार, मनातली जाणिव, नाथनगरी, अभियंता मित्र, लाडोबा, सुभाषित, कुळवाडी, युवा ध्येय, रंगतदार, धमालनगरी, वार्ता, झुंज, मातृरक्षा, सर्वस्पर्शी, कादवा शिवार, पार्टनर, वर्ल्ड सामना, संयम, प्रसाद, चपराक, नवलकथा आणि भूमिका यांसारखे दिवाळी अंक वाचकांचे लक्ष वेधून घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115