चुकीच्या माणसाला उमेदवारी दिली गेली ,म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल ..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शांताराम कटके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला .
वाघोली ग्रामपंचायत उपसरपंच,तसेच पुणे जिल्हा नियोजन समिती चे सदस्य असे अनेक पदे त्यांनी सांभाळत अनेक सामाजिक कामे केली आहेत. दर वर्षी ते पुणे मधे खूप मोठा किर्तन सोहळा आयोजित करतात,तसेच त्यांच्या पत्नी ने लोणीकंद पोलिस स्टेशन ला दक्षता कमिटी च्या माध्यमातून अनेक महिलांचे प्रश्न सोडविले आहेत व वाघोली मधील अनेक महिला ना संसार साठी लागणारे सर्व साहित्य व रोजगार उपलब्ध करून देण्यात कायम अग्रेसर आहेत, सरकारी योजनाचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळवून देणे ,या साठी त्या कायम प्रयत्न करत असतात.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे शांताराम बापू कटके यांना या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशा अनेकांच्या इच्छा मुळे व ती न मिळाल्यामुळे,त्यांनी आज दि.२८/१०/२०२४ रोजी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
त्यांनी १९८ शिरूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज सकाळीच शांताराम बापू कटके यांनी श्री वाघेश्वरांचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन शिरूर येथील बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यात पुष्पहार घालून मोठी रॅली काढून व शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला.
यामुळे शिरुर विधानसभा निवडणुक रंगतदार होणार असून महायुतीची शिरुर येथील उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहीर करताच अनेकांनी नाराजी व्यक्त करून नविलासत्व बंडखोरीचे हत्यार हाती घेतले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शांताराम बापू कटके म्हणाले ,मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्ष आणि अजित पवार यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे. परंतु शिरूर विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने आम्हाला विश्वासात घेतले नाही व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या समोर एक आयात उमेदवार पक्षाने दिला असून, त्यामुळेच मी माझी उमेदवारी दाखल केली आहे. आणि ही उमेदवारी कायम असल्याचा विश्वासही त्यांनी दिला असून, ही निवडणूक एका अपप्रवृत्ती जो वृद्ध वयस्कर लोकांचा सन्मान करत नाही ,ज्या उमेदवाराला पक्षाचा व अजित दादांचा विचारांचा साधा कास ही नाही,अशा चुकीच्या माणसाला उमेदवारी दिली गेली असल्याने,आज मला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली व जनता योग्य उमेदवार निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत आम्ही कायम अशा चुकीच्या विचारांच्या माणसाच्या विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 0
Users Today : 4
Users Yesterday : 9