शिरूर प्रतिनिधी
मा .राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी भाजपा पक्ष वाढवण्यासाठी व महायुती पक्षासाठी प्रामाणिक पणे काम केलेले आहे. पुणे जिल्ह्यात व मावळ मध्ये भरपूर कार्यकर्ते जोडले व मागे झालेल्या लोकसभेसाठी व मागील पाच वर्षात त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्या त्यांनी स्वतः व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रामाणिकपणे पार पाडल्या.
परंतु पक्षासाठी एवढे मोठे योगदान देऊन हि त्यांच्यावर अन्याय झाला व तो सहन न झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू ते लपवू शकले नाही.
शिरूर शहरात मितेश गादिया,गेली अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करत आहेत व त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार ही पाडत आहेत, परंतु विधानसभा निवडणुकीत,उत्तर पुणे जिल्हा ग्रामीण महायुतीमध्ये भाजपला एक सुद्धा जागा नाही असे समजल्यानंतर व भाजपासाठी चांगले काम करणाऱ्या नेत्यांवर होणारा अन्याय सहन न झाल्यामुळे मितेश प्रदीप गादिया यांनी आपल्या ,उपाध्यक्ष -भाजपा पुणे जिल्हा उत्तर ग्रामीण या पदाचा राजीनामा दिलेला आहे. 
शरद भाऊ बुट्टे पाटील, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देत, आपण फक्त पदाचा राजीनामा देत आहोत पार्टीचा नव्हे असे मितेश गादिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.






Users Today : 4
Users Yesterday : 9