शिरुर प्रतिनिधी
बाभुळसर बू!येथे १५/१०/२०२४ रोजी सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या ,जिल्हा नियोजन समिती कला व क्रीडा मार्फत आणि सचिन मचाले पुणे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष यांच्या सहकार्याने जीमचे साहित्य आणि व्यायाम शाळा सुधारणा करणे ७.७० लक्ष मंजूर कामाचा उद्घाटन लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात करण्यात आला.
यावेळी उपस्थित उपसरपंच मोहिनी रणदिवे ,सदस्या मनीषा नागवडे,सदस्य निरंजन नागवडे, नवेश गवळी मा.चेअरमन बाभुळसर सोसायटी,हरिभाऊ नागवडे श्रीदत्त पतसंस्था चेअरमन,संजय पोपट नागवडे,अंकुश टेकवडे,
बाळासो सोपान नागवडे,
भरत नागवडे,सोमनाथ नागवडे,महेंद्र नागवडे,प्रशांत नागवडे,अल्लुद्दीन अल्वी,संपत नागवडे,राजेंद्र नागवडे,बाळासो थोरात,दादा भंडलकर,गजानन रणदिवे,अनिकेत शितोळे,सल्लुद्दिन अल्वी,
आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी व्यायामाचे महत्त्व सांगत,आपल्याला साहित्य दिले गेल्या मुळे,मुलांना व्यायाम करण्यासाठी आता सोपे जाईल,आधुनिक व्यायाम साहित्यामुळे जास्तीत जास्त व्यायाम करुन मुलांचे आरोग्य सुधारेल व शरीर उत्तम राहील व आजच्या खराब वातावरणामुळे व होणाऱ्या बदलांमुळे मुलांच्या मध्ये आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे ,परंतु व्यायाम केल्यामुळे आजरांपासून मुले दूर राहतील व निरोगी राहतील,असा विश्वास दाखवला.






Users Today : 4
Users Yesterday : 9