अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार पवार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन व प्रचारास सुरुवात

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
शिरुर शहरात आमदार ॲड अशोक पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दि.१८ /१०/२०२४ रोजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी च्या उपस्थित मोठ्या उत्साहात करण्यात आले .ओम् शांती शिरूर केंद्राच्या ,शकुंतला दिदी व सुजाता पवार यांच्या हस्ते रिबीन कापून हे उद्घाटन करण्यात आले.
राज्यातील विधानसभा निवडणुक जाहीर झाल्या नंतर राज्यात घडामोडीला वेग आला असुन शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांना महाविकास आघाडीकडुन म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने उमेदवारी निश्चीत असुन त्या पार्श्वभुमीवर या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले .
यावेळी आमदार अशोक पवार यांच्या बरोबर,माजी जिल्हा परिषद सभापती सुजाता पवार ,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विश्वास ढमढेरे ,महिला तालुका अध्यक्ष विद्या भुजबळ ,शहर अध्यक्ष मुज्जफर कुरेशी ,माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे ,विश्वास भोसले ,युवा उद्योजक सचिन कातुरे ,तालुका युवक अध्यक्ष तुषार दसगुडे ,युवक अध्यक्ष अमित शिर्के ,सरदवाडी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा घावटे,खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश पाचर्णे ,विद्यार्थी अध्यक्ष आदित्य उबाळे ,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष राजुद्दीन सय्यद ,लिगल सेलचे अध्यक्ष ॲड रविंद्र खांडरे ,
शिरुर शहर कॉंग्रेस अध्यक्ष ॲड किरण आंबेकर ,बाजार समिती माजी संचालक सुदीप गुंदेचा , कॉंग्रेस आय अल्पसंख्याक अध्यक्ष अजीम सय्यद ,युवती तालुका अध्यक्षा संगिता शेवाळे , युवती अध्यक्ष गीताराणी आढाव ,सागर नरवडे, निलेश लटबळे,राणी कर्डिले , महिला शहर अध्यक्षा डॉ स्मिता कवाद , प्रा विलास आंबेकर ,सविता बोरुढे,मनिषा दळवी,
माजी नगरसेवक अशोक पवार ,आबिद शेख ,पोपटलाल ओस्तवाल,पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहील शेख , शिरुर शहर कार्याध्यक्ष कलिम सय्यद ,हाफीज बागवान , धरमचंद फुलफ गर,खरेदी विक्री संचालक शहाजी ढमढेरे ,शशिकला काळे ,प्रियंका धोत्रे आदी उपस्थित होते .
राज्यातील सरकार हे फक्त तोडा फोडीचे आहे व पक्ष व अमच्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते फोडण्या साठी काही ही करू शकतात,याचेच उदाहरण घोडगंगा साखर कारखाना बंद पडणे.शिरूर हवेलीतील जनतेला कारखाना कोणी व कसा बंद पाडला हे माहीत आहे व आपले महाविकास आघाडी चे सरकार येताच,तो परत चालू होणार,असे आश्वासन अशोक पवार यांनी यावेळी बोलताना दिले.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून,आमदार अशोक पवार यांनी आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा च्या प्रचाराला सुरुवात केली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 6 6
Users Today : 0
Users Yesterday : 9