शिरूरचा विकास हेच ध्येय:आ.अशोक बापू पवार

Facebook
Twitter
WhatsApp

शिरुर प्रतिनिधी
शिरूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिरूर शहराचे नेते प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या सोबतीने सुरु असून, शासकीय कार्यालय, अत्याधुनिक क्रीडांगण,नविन पाणीपुरवठा यासारख्या अनेक विकास कामे करून शिरूर शहर अद्यावत करून विकासाचा राज्यात पॅटर्न करणार असल्याचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

शिरूर शहरांतील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे बांधकाम करणे १ कोटी ८२ लाख, शिरूर येथे अद्यावत विश्रामगृहाचे बांधकाम करणे ३ कोटी २५ लाख,आरोग्य पथक वसतिगृह आवार संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे. ९९ लाख असा एकूण ६ कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता जाधव,शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, ॲड. शिरीष लोळगे,नगरसेवक मंगेश खांडरे, वकील सेलचे तालुकाध्यक्ष प्रदीप बारवकर ,शहराध्यक्ष रवींद्र खांडरे, संजय ढमढेरे, निमोणे माजी सरपंच विजय भोस,अजीम सय्यद, नगरसेविका ज्योती लोखंडे, महीला शहराध्यक्ष सीमा कवाद,राणीताई कर्डिले, शशिकला काळे, प्रियांका धोत्रे,युवती शहराध्यक्ष गीताराणी आढाव, सविता बोरुडे, हाफीज बागवान, राहील शेख, राजुद्दिन सय्यद, तुषार दसगुडे, बिजवंत शिंदे, राजेंद्र जाधवराव,
उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार म्हणाली आमदार अशोक पवार म्हणजे विकास आणि विकास म्हणजे आमदार अशोक पवार हे समीकरण असून शिरूर शहरात आमदार पवार व शहराचे नेते दानशूर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या माध्यमातून शिरूर शहरात मोठा निधी उपलब्ध करून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकासाचा ध्यास घेतलेले आमदार अशोक पवार यांना पुन्हा विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी बाजारसनितीचे विश्वासकाका ढमढेरे, ॲड. शिरीष लोळगे, गीताराणी आढाव, यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आभार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 6 9
Users Today : 3
Users Yesterday : 9