कोरेगाव भिमा प्रतिनिधी(विनायक साबळे) :
पुणे नगर रोड हा मृत्यूचा सापळा बनला असून युवा तरुणाला डंपरने त्याच्या दुचाकीला पाठीमाघून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास वाघोलीत पुणे नगर महामार्गावर रिलायन्स मार्ट जाधव वस्ती समोर घडली आहे.
या अपघातानंतर डंपर चालक त्वरित डंपर सह प्रसार झाला आहे. पुणे नगर रोडवर महिन्याला चार ते पाच जण अपघातामध्ये बळी जात असून याला सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे प्रादेशिक परिवहन मंडळ, पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार असून आजून किती बळी गेल्यावर संबंधित विभागाच्या निगरगट्ठठ्ठ व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनाजाग येणार असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. चैतन्य उमेश शिंदे, (वय २३ वर्षे, रा सुप्रीम आंगण सोसायटी, बायफ रोड, वाघोली) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य हा खराडी येथील एक खाजगी कंपनीत कामाला होता. तो आपल्या दुचाकीवर सकाळी खराडीतील कंपनीत जात होता. पुणे नगर महामार्गावर रिलायन्स मार्ट, जाधव वस्ती येथे डंपरने त्याला धडक दिली. तो मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला. अपघात एका तरुणाने ११२ नंबर वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी त्यानंतर त्याच्या गाडीवरून त्याच्या पालकाला माहिती दिली. त्याला रुग्णवाहिकेतून ससून मध्ये हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्या डंपर ने धडक दिली तो हडपसर येथील असल्याचे कळते. मृत्यूची बातमी कळताच वाघोली परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.






Users Today : 0
Users Yesterday : 9