शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहर नाभिक संघटनेच्या ( अ ) शिरूर शहर अध्यक्षपदी येथील प्रितेश फुलडाळे यांची निवड झाली.
सामाजिक काम करत असताना फुलडाळे यांनी शिरूर शहरातील रस्त्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या,ड्रेनेज लाईनच्या समस्या, दशक्रिया विधी घाटावरील समस्या,मोकाट कुत्र्यांचा प्रश्न यांसह विविध विषयांवर समाजमा़ध्यमांमधून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम करत असून शिरूर शहरातील नाभिक समाज बांधवांना विमा संरक्षण देण्याबरोबरच गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच आदर्श माता व आदर्श पिता पुरस्कर देऊन गौरविण्यात येणार असून सर्वांना बरोबर घेऊन प्रत्येकाच्या सुचनांचा आदर करुन सर्वांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताचे विविध उपक्रम राबवणार आहे त्याचबरोबर अडिअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर अध्यक्ष प्रितेश फुलडाळे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते फुलडाळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिरूर शहरासह तालुक्यातून शुभेच्छा दिल्या जात आहे.






Users Today : 4
Users Yesterday : 9