कोरेगाव प्रतिनिधी
बकोरी येथील छावा प्रतिष्ठानचा ऊपक्रम.
बकोरी येथील छावा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सव सण साजरा केला जातो .
बकोरी येथील वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे यांनी सर्व गणपती म़डळांना आव्हान केले होते की ,आपण सर्वांनी खर्चात काटकसर करून वृक्षरोपण करावे ते आव्हान स्वीकारून छावा प्रतिष्ठान या मंडळाने यावर्षी खर्चामध्ये काटकसर करण्याचे ठरवले व बकोरी देवराई वनराई प्रकल्पात १११ देशी झाडांचे वृक्षारोपण केले.
तसेच संगोपनासाठी ५०५२ रूपयाची मदतही केली .बकोरी देवराई वनराई प्रकल्पाचे माध्यमातून सर्वांचे स्वागत वनराईचे प्रमुख चंद्रकांत वारघडे यांनी केले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ऊपस्थीतामध्ये राजेन कुटे,सागर कुटे, सर्जेराव कुटे, रामराम कुटे,साजन कुटे,पै.कृष्णा कोलते, निलेश कुटे,महेश जाधव, सिद्धेश जाधव, ज्ञानेश्वर मगर,विजय वारघडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही सर्वजण कुटे वस्ती,जाधव वस्ती,कोलते वस्ती, मगरवस्ती,विजय वारघडे वस्ती,माहेर संस्था हे सर्वजण एकत्र येऊन ,एकच गणपती बसवत असतो व सर्वजन खुप चांगल्या पद्धतीने एकत्रित नियोजन करून कार्यक्रम पार पाडत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजन कुटे यांनी सांगितले.
प्रत्येक तरुण मंडळाने खर्चात काटकसर करून अशाप्रकारे वृक्षरोपण करावे,एखादा तलाव खोलीकरण करावे ,नवीन तलाव खोदावा अशाप्रकारचे आव्हान वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे यांनी केले.






Users Today : 4
Users Yesterday : 9