पुणे प्रतिनिधी: सागर पवार
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाचे हे उत्सवाचे १३२ वे वर्षे आहे, त्याचे अवचित्य साधत ,३५१किली चा प्रसाद रुपी लाडू बनवण्यात आला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या १३२ व्या वर्षी प्रभात फरसाण हाऊसच्या मालाणी परिवार तर्फे ३५१ किलो बुंदीचा मोदक श्रीं ना अर्पण करण्यात आला. श्रीं समोर नैवेद्य दाखवून हा मोदक प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात आला.
मालाणी परिवारातर्फे दरवर्षी हा मोदक अर्पण करतात ,साजूक तूप, केसर, मोतीचूर, ड्रायफ्रूट वापरुन हा मोदक येतो .
दिवसभरात राजकीय, शैक्षणिक, प्रशसकीय, सामाजिक क्षेत्रातल मान्यवर दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत असतात ,यामध्ये थायलंड येथील गणेशभक्त, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. शां.ब.मुजुमदार, खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी खासदार मनोज कोटक, भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
- [श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या १३२ व्या वर्षी प्रभात फरसाण हाऊसच्या मालाणी परिवार तर्फे ३५१ किलो बुंदीचा मोदक अर्पण करण्यात आला.]






Users Today : 4
Users Yesterday : 9