महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन, दि.6/09/2024 रोजी
सकाळी.९ वा.पासून कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती, शरद पवळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत व दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी तसेच भाऊ हिस्सेदारी यालाच खतपाणी घालणारे, तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस.
तसेच शेतरस्त्यांच्या निर्माण झालेल्या समस्या , याशिवाय आधुनिक यंत्रामुळे शेतकरी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, शेतीपुरक व्यवसाय व इतर सर्व कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे, तसेच शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरता व यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या वाटेची आवश्यकता कायम भेडसावत असते.
शिव, पानंद शेत रस्त्यांचा प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.Κ
राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून शिव, शेत व पानंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्त्यांची मोजणी व शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करावी या बाबत तशा सूचना ही देखील केल्या आहेत.
परंतु तहसील कार्यालयांसह संबंधित विभागांकडून शेतकऱ्यांची होणारी कायम अवहेलना होत आहे व ती थांबवण्यासाठी राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्याचा महासंकल्प महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने करण्यात आलेला आहे, तसेच अनेक शेतजमिनी शेतरस्त्याअभावी पडीक पडत चालल्या असुन अनेक फौजदारी स्वरूपांच्या घटनाही समोर येत आहेत.
रस्त्याअभावी शेतकऱ्यांवर कवडीमोल किमतीने शेतजमीनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरआलेली आहे, परंतु अर्ज बनवण्यापासून ते कोर्टाच्या अंतीम निकालापर्यंतचा शेतकऱ्यांचा पिढयान पिढया चाललेला संघर्ष थांबवत नाही , म्हणून शिव पाणंद शेतरस्ता कृती समिती शिरूर यांच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले ,असुन शेतकऱ्यांनी आपल्या समस्या माडून न्याय मिळवण्याबरोबर, शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या बळकटीकरणासाठी उपस्थित रहावे, असे अवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

[शिव,पानंद शेत रस्त्यांची मोजणी व हद्द निश्चित नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये शेतरस्त्यांमुळे निर्माण होणारे वाद वाढत चालले असून ११ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयाच्या अंमलबजानीसाठी प्रशासकीय न्यायालयीन जनआंदोलन,जनजागृतीद्वारे शेतकऱ्यांच्या संघर्षला पुर्णविराम देण्याच काम महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातुन करत राहणार , असे मत ही यावेळी शरद पवळे यांनी व्यक्त केले.]

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 0
Users Today : 4
Users Yesterday : 9