वाघोली प्रतिनिधी
वाघोली येथील पाणी, वाहतूक कोंडी, सांडपाणी आणि मालमत्ता कर या समस्यांवरील उपाययोजनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी भर पावसात वाघोलीतील नागरिक रस्त्यावर धावले. महापालिकेने वाघोलीतील समस्यांकडे लक्ष दिले नाही तर महापालिकेवर धाव घेणार असल्याचा इशारा मॅरेथॉनमध्ये आमदार अशोक पवार यांनी दिला .
वाघोलीतील मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रन फॉर वाघोली या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाघोलीत रविवारी (दि.२५) करण्यात आले होते. या स्पर्धेला वाघोली नागरिकांनी भर पावसात चांगला प्रतिसाद दिला. वाघोलीतीलच नव्हे तर शिरूर हवेली मतदार संघातील नागरिकही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नियोजनासाठी उपस्थित होते. चार वयोगटात आयोजित मॅरेथॉनला अभिषेक लॉन्स येथून सुरुवात झाली. नगर रोड मार्गे बकोरी फाटा येथे दत्तकृपा पार्किंग येथे समारोप झाला. पुरुष व महिला गटात प्रथम तीन क्रमांक आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्हांचे वाटप धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
केवळ मॅरेथॉन साठी पळू नका. दररोज व्यायामाला वेळ द्या. वेळ दिला तरच वेळ मिळतो. मी जर व्यायामाला दोन तास देवू शकतो तर तुम्हीही देवू शकाल. वाहन जसे आपण वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करतो तसे आपले शरीरही दररोज व्यायामाने सर्व्हिसिंग केले पाहिजे. वाघोलीचे प्रश्न अशोक पवार नक्की सोडवतील. असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना व्यक्त केला.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर ,आमदार अशोक पवार, मा. जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार, मा. सरपंच वसुंधरा उबाळे, जयश्री सातव, मीना काकी सातव, शिवदास उबाळे, राजेंद्र सातव, बाळासाहेब सातव, तालुकाध्यक्ष संदीप गोते, किसन जाधव, बाळासाहेब शिवरकर, प्रकाश जमधने व शिरूर शहरातून ही,रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले,राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष युवक तालुका अध्यक्ष तुषार दसगुडे,युवती अध्यक्षा गीता आढाव,सविता बोरुडे, प्रीती बनसोडे,प्रियंका धोत्रे,सुरेश पाचर्णे यांच्यासह जवळपास चार हजाराच्या आसपास स्पर्धक व वाघोलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Users Today : 4
Users Yesterday : 9