पुणे प्रतिनिधी: सागर पवार
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत डॉ.रम्या सुरेश यांचे भरतनाट्यम सादरीकरण शनीवार,दि.२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजता आयोजित करण्यात आले होते.
हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.पारंपारिक रचना आलिरीपूने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर राग कल्याणी रूपक ताल ‘ वर्णम’ , ‘तमिळ पदम् ‘ राग सावेरी ,ताल आदी मधील रचना सादर करण्यात आल्या. तिल्लाना या नृत्य प्रकाराने कार्यक्रमाची सांगता झाली. सौ . गौरी भावे-बीडकर यांनी प्रास्ताविक केले .
रसिकांना हा कार्यक्रम विनामूल्य खुला होता .भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २२२ वा कार्यक्रम होता.






Users Today : 4
Users Yesterday : 9