महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना ,संप करणार..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी

 

दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे महाराष्ट्र राज्य नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटनेची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय उत्साहात पार पडली.

याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र विविध नगर परिषदांचे संवर्ग अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव जामोद विधानसभा आमदार संजय कुटे, खामगाव विधानसभा आमदार आकाश फुंडकर हे उपस्थित होते.

 

यावेळी संघटनेच्या माध्यमातून मागील काळात विविध संवर्ग अधिकार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या कार्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच, पुढील काळात ज्या मागण्या शासन स्तरावरून सोडवायच्या आहेत ,त्याबाबत सविस्तर व विस्तृत चर्चा करण्यात आली.

संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास चव्हाण यांनी संवर्ग अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न मांडले, त्यावर आमदार महोदयांनी सदरील प्रश्न जिव्हाळ्याचे असल्याने ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शासनाकडून सोडविण्यात येतील असे सर्वांना आश्वासन दिले.

सभेस मुख्याधिकारी जयश्री काटकर, आशिष बोबडे, सतीश पुदाके, विजयकुमार आश्रमा, तसेच, संघटना कार्याध्यक्षा तृप्ती भामरे, सचिव जयवंत काटकर, घटना समिती अध्यक्ष राहुल पिसाळ, नाशिक विभागाध्यक्ष महेंद्र कातोरे, पुणे विभागाध्यक्ष सुनील गोर्डे, अमरावती विभागाध्यक्ष अमोल इंगळे आदी सदस्य व पदाधिकार्यांनी मार्गदर्शन केले.

 

संघटनेचा वार्षिक लेखाजोखा अर्जुन गुट्टे यांनी मांडला. यावेळी विविध पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

जुनी पेन्शन योजना व संवर्गाचे मूलभूत समस्या/मागण्यावर शासन स्तरावर दुर्लक्ष होत असल्याने दिनांक 29 ऑगस्ट पासून सर्व संघटना सह संपात सहभागी होण्याचा निर्णय एकमताने यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धीप्रमुख राहुल कुटे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यास अमरावती विभागाध्यक्ष अमोल इंगळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष योगेश घुगे, जगन्नाथ थोरात, रवींद्र सूर्यवंशी आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 0
Users Today : 4
Users Yesterday : 9