कोरेगाव भिमा/प्रतिनिधी: विनायक साबळे
बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना एक इसम केसनंद फाटा वाघोली येथे उभा असुन त्याचेकडे गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस कर्मचारी यांच्या माहितीप्रमाणे जावून खात्री केली असता, इसम नामे सुनिल बारेला, (वय २४ वर्षे, रा. फुलमळा,
वाघोली.पुणे) हा पोलीसांना पाहुन घाईगडबडीने तेथुन निघुन जाण्याचा प्रयत्न करू लागला असता त्यास सोबतच्या कर्मचारी यांच्या मदतीने ताब्यात घेवून त्याच्याकडे चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी करुन अभिलेख तपासले असता लोणीकंद पो.स्टे.(गु.र.नं. 637/2022 भा दं वि क 379) प्रमाणे गुन्हा नोंद असलेबाबत समजले. पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस उपआयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे , मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २ सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट – ६ चे पोलीस निरीक्षक प्रताप पोमन , पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली.






Users Today : 0
Users Yesterday : 9