रांजणगाव गणपती प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील ग्रामीण शिक्षण मंडळाच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय चांडोहतील विद्यार्थीनींनी एक राखी सैनिकांसाठी उपक्रमा अंतर्गत तब्बल दोनशे राख्या स्वतः तयार करून देशाच्या सिमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी दि.१४ रोजी सुपुर्त केल्या.मेजर संतोष धोंडिभाऊ पानमंद यांनी या राख्यांचा स्वीकार करून ते जम्मू काश्मीर येथील देशाच्या सिमेवर तैनात बटालियन कडे रवाना झाले.
गावडे विद्यालयात स्वातंत्रयाचा अमृत मोहत्सव प्रसंगी बुधवारी सकळी चांडोह गावचे सुपूत्र मेजर संतोष पानमंद यांनी मानवंदना देऊन ध्वजरोहन केले तसेच उपस्थित मान्यवरांसमवेत विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामीदेत ध्वजगीत सादर केले.तदनंतर झालेल्या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींनी तयार केलेल्या राख्या मेजर पानमंद यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केल्या.या कामी मुख्याध्यापक विलास घोडे यांनी एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमासाठी केलेल्या आवाहनाला साद देत शिक्षिका प्रियंका सुपे,निलम कानसकर यांसह सर्व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली मुलींनी मोठ्या उत्साहाने राख्या तयार केल्या होत्या.
यावेळी शिरूर तालुका खरेदी विक्री संघ संचालक संपत पानमंद,प्रसिद्ध गाडा मालक शरद खराडे,पोलीस पाटील सुदर्शन भाकरे,सोसायटी व्हाईस चेअरमन नामदेव शिंदे,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सालकर,प्रगतशील शेतकरी रखमा शेलार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय गोडसे,ज्येष्ठ शिक्षक अशोक गाडिलकर,नवनाथ राऊत, संभाजी खोडदे,नवनाथ लाळगे,बबन चोरे,प्रविण कांदळकर,दादाभाऊ पानमंद,सुरेश गावडे ,पत्रकार मारुती पळसकर यांसह ग्रामस्थ,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नऱ्हे यांनी तर आभार अशोक गाडिलकर यांनी मानले.






Users Today : 0
Users Yesterday : 9